राज्य सरकारची आणखी एक नवी योजना
कर्जव्याज परतावा योजनेत मिळणार फायदे
निवडणुकीआधी सरकारची मोठी घोषणा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहेत. निवडणुका तोंडावर असतानाच सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारने नवीन योजनेची घोषणा केली आहे. ही योजना तरुणांसाठी राबवण्यात येणार आहे. कर्जव्याज परतावा योजना असं या योजनेचं नाव आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका तोंडावर असताना सरकारने नागरिकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारने ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजातील तरुणांसाठी कर्जव्याज परतावा योजना राबवली आहे. या निर्णयामुळे सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत तरुणांना काहीतरी व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज जर तरुणांनी वेळेवर फेडले तर त्यावरील व्याज पुन्हा मिळणार आहे. म्हणजे जवळपास कोणत्याही व्याजाशिवाय तुम्हाला कर्ज मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला कर्जाचे हप्ते वेळेवर भरावे लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे स्टार्टअप सुरु करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने परशुराम महामंडळाची स्थापना केली होती. यासाठी १० कोटींचा निधी दिला होता. याचसोबत ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणदेखील देण्यात आले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच ब्राह्मण, राजपूत, आर्यवैश्य समाजासाठी योजना सुरु केल्याने तरुणांना दिलासा मिळाला आहे.
या योजनेत दरवर्षी ५० लाभार्थ्यांना कर्ज दिले जाणार आहे. १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. जर हे कर्ज फेडले तर व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. गट कर्ज योजनेत ५० लाखांपर्यंतच्या कर्जावरही परतावा मिळणार आहे. मात्र, या गट योजनेत कर्जाची कमाल मर्यादा १५ लाख असणार आहे.
या योजनेअंतर्गत तुम्ही कर्जाचा हप्ता भरल्यानंतर त्याची माहिती १५ दिवसांच्या आत महामंडळाला देणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला व्याज परतावा मिळणार नाही. या योजनेमुळे ब्राह्मण, राजपूत आणि आर्यवैश्य समाजातील तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत मिळेल. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सरकारला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.