Maharashtra Budget 2024 Date News: Budget Session will Start From 26 February and The Budget Will Be Presented On February 28 Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2024 Date: अर्थसंकल्पीय‌ अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून; अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला मांडणार

Maharashtra Budget Session 2024 Date : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यात येईल.

Sandeep Gawade

Maharashtra Budget Session

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण, त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर केला जाईल. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. सन २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर शासकीय कामकाजाला सुरुवात होईल.

बुधवारी, २८ फेब्रुवारी रोजी शासकीय कामकाजाला सुरुवात होईल. त्यानंतर सन २०२४ -२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा करण्यात येणार आहे.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद राज्यात सुरू आहे. दुसरीकडे गुन्हेगारांसोबतच्या फोटोवरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसेच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचे प्रकरण ताजे आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. यासह एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. तसेच अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि नाव मिळाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसमध्येही फूट पडणार, अशी चर्चा आहे. यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीला सुरू होईल. पहिल्या दिवशी विधानसभेत राज्यपालांचे अभिभाषण, त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव सादर केला जाईल. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. सन 2023-24 च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर शासकीय कामकाजाला सुरुवात होईल.

28 फेब्रुवारीला शासकीय कामकाजाला सुरुवात होईल. त्यानंतर सन 2024 -25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT