NCB Recruitment 2024 Saam tv
महाराष्ट्र

NCB Recruitment 2025 : नार्कोटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोणती आणि किती पदे भरली जाणार? वाचा सविस्तर

NCB Recruitment 2025 News : नार्कोटिक्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. नार्कोटिक्समध्ये कोणती आणि किती पदे भरली जाणार आहेत, याविषयी जाणून घेऊयात.

Saam Tv

राज्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास मंजुर देण्यात आली आहे. या फोर्ससाठी ३४६ पद आणि त्यासाठीच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस होते.

राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या स्थापन करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी एकूण आवश्यक ३४६ पदांच्या मनुष्यबळाच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आलीये. यासाठी ३१० पदे नियमित असणार आहेत. तर ३६ पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत.

नियमित पदे कोणती ?

विशेष पोलीस महानिरीक्षक- एक, पोलीस उपमहानिरीक्षक एक, पोलीस अधीक्षक-तीन, अपर पोलीस अधीक्षक-तीन, पोलीस अधीक्षक- १०, पोलीस निरीक्षक १५, सहाय्यक पोलीस निरीक्षक - १५, पोलीस उपनिरीक्षक - २०, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक - ३५, पोलीस हवालदार - ४८, पोलीस शिपाई - ८३, चालक पोलीस हवालदार -१८, चालक पोलीस शिपाई -३२, कार्यालय अधीक्षक - एक, प्रमुख लिपीक - दोन , वरिष्ठ श्रेणी लिपीक -११, कनिष्ठ श्रेणी लिपीक - ७, उच्च श्रेणी लघुलेखक - दोन, निम्न श्रेणी, लघुलेखक – तीन.

बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे

वैज्ञानिक सहाय्यक-तीन, विधी अधिकारी - तीन, कार्यालयीन शिपाई -१८, सफाईगार - १२ एकूण - ३६. यासाठी येणारा आवर्ती खर्च हा रुपये १९, २४, १८,३८० रुपये तर वाहन खरेदीसह अनावर्ती खर्चास ३,१२,९८,००० मान्यता देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT