SSC Exam Result 2022 news updates Saam Tv
महाराष्ट्र

SSC Result 2022: यंदाही कोकणची कमाल, नाशिक विभाग शेवटून पहिला; असा आहे विभागनिहाय निकाल

यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील निकाल - ९६.९४ % इतका लागला. यंदा कोकण (Kokan) विभागाची बाजी तर नाशिक (Nashik) विभाग सर्वात शेवटी असल्याचं समोर आलं आहे. कोकण विभागाचा निकाल ९९.२७% तर नाशिक विभागाचा निकाल ९५.९०% इतका लागला आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. (SSC Exam Result 2022 news updates)

यंदा १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. आनंदाची बाब म्हणजे यंदा राज्यातील १२ हजार २१० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याशिवाय ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागला.

हे देखील पाहा -

दहावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हती. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्याने दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

विभागनिहाय टक्केवारी

कोकण विभाग - ९९.२७टक्के

कोल्हापूर विभाग - ९८.५०टक्के

नागपूर विभाग -९७ टक्के

पुणे विभाग - ९६.९६ टक्के

मुंबई विभाग - ९६.९४ टक्के

अमरावती विभाग -९६.८१ टक्के

औरंगाबाद विभाग - ९६.३३ टक्के

नाशिक विभाग - ९५.९०टक्के

लातूर विभाग - ९७.२७टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT