SSC HSC Result 2025 Saam tv
महाराष्ट्र

SSC-HSC Result Date: प्रतीक्षा संपली! दहावी-बारावीच्या निकालाची नवीन तारीख समोर, 'या' दिवशी लागणार रिझल्ट

SSC HSC Result 2025: दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लवकरच दहावी-बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. निकालाच्या तारखेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. याच महिन्यात निकाल लागणार आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

दहावी, बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी-बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. निकालाची नवीन तारीख समोर आली आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांची निकालाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. १५ मे रोजी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होतील अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

'राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच निकाल देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या १५ मेपर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील,' अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा दर वर्षीपेक्षा यंदा १० दिवस लवकर सुरू झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेसोबतच निकाल देखील लवकर जाहीर केला जाणार आहे. सध्या सर्व विभागीय मंडळांच्या निकालाचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ५ ते १० जून या कालावधीत दहावीचा निकाल जाहीर होईल. तर १५ मेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर होईल.

दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होताच तो तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तात्काळ पाहू शकता. यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या हॉल तिकीटाचा नंबर असणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावीचा निकाल तुम्हाला कोण-कोणत्या वेबसाइटवर पाहयला मिळणार हे घ्या जाणून....

- mahahsscboard.in

- mahresult.nic.in

- hscresult.mkcl.org

- msbshse.co.in

- mh-ssc.ac.in

- sscboardpune.in

- sscresult.mkcl.org

- hsc.mahresults.org.in

कसा चेक कराल निकाल?

- विद्यार्थ्यांनी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.

- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.

- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका. त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.

- त्यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.

- हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

SCROLL FOR NEXT