Debate intensifies in Maharashtra Assembly over the need for a men protection law after the passing of the Shakti Act. Saam TV
महाराष्ट्र

खरात अघोरी, कशासाठी 5 नरबळी? खरात कुणासाठी द्यायचा नरबळी?

Shakti Law Passed, But What About Men Rights: अघोरी विद्येचा वापर करून लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या खरातनं 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय.... मात्र खरातनं हे नरबळी नेमके कशासाठी दिले? खरातची राक्षसी महत्त्वाकांक्षा नेमकी काय होती? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

खरात फाईल्समधून दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.. लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडत..... भीती विकत..... महिलांवर अत्याचार करणाऱ्या या वासनांध खरातनं अघोरी कृत्यासाठी चक्क नरबळी घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय... नाशिक कोर्टात एसआयटीनं खरातने अघोरी कृत्यासाठी 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला... आणि कोर्टातील प्रत्येकाच्या अंगावर काटा आला... दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विधानसभेत निवेदन करताना पोलिसांनी खरातच्या अलिशान फार्म हाऊसमधून 1 पिस्तूल आणि 23 बुलेट आणि 3 वापरलेल्या बंदुकीच्या गोळ्यांची माहिती दिली... आणि खरातने नरबळी दिल्याच्या प्रकारावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केलं.

खरातनं नरबळी घेतल्याचा संशय बळावल्यानं त्याबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी साम टीव्ही थेट पोहोचलं ते खरातच्या मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिर परिसरात..... आणि इथंच काही धक्कादायक गोष्टी आढळून आल्या

एवढंच नाही तर खरात ज्या विहीवर अघोरी कृत्य करायचा... काळ्या जादूसाठी लोकांना रिमोट कंट्रोलचा नाग आणि नकली वाघाची भीती दाखवून त्यांच्या श्रद्धेचा बाजार मांडायचा... महिलांना घाबरवून वश करायचा... त्या विहीरीवर साम टीव्ही पोहोचल.... तिथंही चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहे

आता प्रश्न हा की खरातनं हे नरबळी कशासाठी घेतले....बड्या भक्तांना राजकीय पदं मिळवून देण्यासाठी, शासकीय अधिकाऱ्यांना बदली आणि बढती मिळवून देण्यासाठी .... की स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षेसाठी... याचं गूढ अजूनही कायम आहे... त्यामुळे पोलिसांनी याच गोष्टीच्या मुळाशी जावून खरातच्या विकृतीचं जाळं उद्ध्वस्त करण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : पुण्याहून लग्नाहून परत येताना भीषण अपघात, रिक्षाला जोरात धडक, २ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढला

दरवाढीचा भडका! LPG सिलिंडर तब्बल ९९३ रुपयांनी महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

Friday Horoscope: या राशींनी महत्त्वाच्या निर्णयात घाई करू नये, वाचा आजचं राशीभविष्य

Pune Crime: पुणे हादरले! दुसऱ्याशी लग्न ठरल्याचा राग, तरुणाने घरात घुसून गर्लफ्रेंडवर चाकूने केले सपासप वार

SCROLL FOR NEXT