Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २८ हजारहून अधिक रोजगार निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती

Maharashtra investment: महाराष्ट्रात 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित. 10 सामंजस्य करारांमुळे तब्बल 25 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती. डेटा सेंटर आणि सौरऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर.

Bhagyashree Kamble

  • महाराष्ट्रात 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित.

  • 10 सामंजस्य करारांमुळे तब्बल 25 हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती.

  • डेटा सेंटर आणि सौरऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर.

  • हायपरलूप प्रकल्पाला गती, लॉजिस्टिक आणि वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल अपेक्षित.

महाराष्ट्र "डेटा सेंटर कॅपिटल" आणि "सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल" म्हणून देशात आपली ओळख प्रस्थापित करत आहे. विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदारांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे उत्पादन क्षेत्रातही क्रांतिकारक बदल होणार आहेत.

युकेसोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे महाराष्ट्रात नव्या गुंतवणुकीचे दरवाजे उघडले असून, हे गुंतवणूकदारांचा विश्वास तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील श्रद्धेचे द्योतक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत १० सामंजस्य करार (MoUs) आणि २ रणनीतिक करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यात तब्बल 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 28 हजार 892 रोजगारनिर्मिती होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज मंत्रालयातील समिती कक्षात १० सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले. त्यावेळी ते गुंतवणूकदारांसमोर बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेशकुमार, उद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, तसेच विविध क्षेत्रातील कंपन्यांचे गुंतवणूकदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुंतवणूकदारांनी सकारात्मक आणि ठाम बांधिलकी दाखवली असून, राज्य शासनाची संपूर्ण टीम सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांना सर्वतोपरी मदत करेल. याशिवाय हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळत असून, आयआयटी मुंबई आणि आयआयटी मद्रास यांच्यामुळे हा प्रकल्प लॉजिस्टिक, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवेल, असे त्यांनी नमूद केले.

झालेले प्रमुख करार :

ज्युपिटर इंटरनॅशनल लि. – सोलर पॅनेल निर्मिती, ₹10,900 कोटी गुंतवणूक, 8,308 रोजगार

रोचक सिस्टिम्स प्रा.लि. – डेटा सेंटर, ₹2,508 कोटी गुंतवणूक, 1,000 रोजगार

रोव्हिसन टेक हब प्रा.लि. – डेटा सेंटर, ₹2,564 कोटी गुंतवणूक, 1,100 रोजगार

वॉव आयर्न अँड स्टील प्रा.लि. – पोलाद उद्योग, ₹4,300 कोटी गुंतवणूक, 1,500 रोजगार

वेबमिंट डिजिटल प्रा.लि. – डेटा सेंटर, ₹4,846 कोटी गुंतवणूक, 2,050 रोजगार

अ‍ॅटलास्ट कॉपको – औद्योगिक उपकरणे, ₹575 कोटी गुंतवणूक, 3,400 रोजगार

एलएनके ग्रीन एनर्जी – हरित ऊर्जा, ₹4,700 कोटी गुंतवणूक, 2,500 रोजगार

प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्ट लि. – डेटा सेंटर व लॉजिस्टिक रिअल इस्टेट, ₹12,500 कोटी गुंतवणूक, 8,700 रोजगार

याशिवाय,

ग्लोबल इंडिया बिझिनेस कॉरिडॉर तर्फे यूके व युरोपमधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सहकार्याचा करार.

टीयूटीआर हायपरलूप प्रा.लि. तर्फे जेएनपीटी व वाढवण बंदरावर अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारणीसाठी करार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

Balasaheb Thorat : तत्व आणि विचारांसाठी बलिदान द्यायला तयार; बाळासाहेब थोरात यांची कीर्तनकार संग्राम भंडारेंच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया

White Hair Problems: 'या' २ गोष्टींचे तेल केसांना लावा आणि तुमचे पांढरे केस पुन्हा काळे करा

Mumbai Airport: मुंबई आभाळ फाटलं! मुसळधार पावसामुळे एअरपोर्ट पाण्याखाली, विमानसेवेवर परिणाम; पाहा VIDEO

KBC: विराट कोहलीच्या फ्लाइंग किसवर अमिताभ बच्चन यांचा यॉर्कर; अनुष्का शर्मा क्लीनबोल्ड

SCROLL FOR NEXT