शासकीय कार्यालय व शाळा यांना मिळणाऱ्या सुट्ट्या हा सर्वाच्या चर्चेतील विषय. आपण अनेकदा वर्षभरात किती सुट्ट्या येतात. किती निमित्तमात्र सुट्टी असणार याचा हिशोब करत जात असतो. त्यानुसार वर्षातील सहली आणि गावी जाण्याचं नियोजन केलं जातं. शालेय शिक्षण विभागाने आज शाळेतील सुट्ट्याचे वेळापत्रक जाहीर केलंय. चला तर मग जाणून घेऊन या वर्षात विद्यार्थ्यांना केव्हा आणि किती सुट्ट्या मिळतील. (Maharashtra School Education Department Releases Full List of Holidays)
विदर्भ वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील शाळा १५ जून सुरू झाल्या. राज्यातील शाळांच्या सुट्ट्या आणि शाळा सुरू करण्याच्या तारखांबाबत एकसारखेपणा ठेवण्यात आलाय. आता विद्यार्थ्यांना या वर्षात किती दिवस सुट्ट्या असणार याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना ५२ रविवार वगळून वर्षभरात ७६ सुट्ट्या लागू होणार आहेत.
तर वर्षभरात १२८ दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. यात दिवाळीसाठी फक्त १० दिवस सुट्ट्या असणार आहेत. १६ ते २७ ऑक्टोबर म्हणजे १० दिवस सुट्ट्या असतील. तर उन्हाळी सुट्ट्या २ मे ते १३ जून दरम्यान असणार आहेत. उन्हाळ्यात तब्बल ३८ दिवस शाळा बंद असणार आहेत. दरम्यान सुट्ट्याचे वेळापत्रक जाहीर करताना शालेय विभागाने काही सूचनाही केल्या आहेत. गावच्या यात्रेचा अपवाद वगळून सलग तीन दिवस शाळा बंद राहणार नाहीत, याची खबरदारी शाळेच्या मुख्याध्यापकांना घ्यावे, असं विभागाकडून सांगण्यात आले आहे. आदेशानुसार स्थानिक परिस्थिती तपासण्यात यावी.
नमूद यादीतील तारखेला संबंधित सण येत नसल्यास मुख्याध्यापकांनी सुट्टी देण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता घ्यावी. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांची पूर्व मान्यता घ्यावी. मुख्याध्यापक अधिकारात सुट्टी घेत असतांना त्या मुख्याध्यापकाने तीन दिवस पूर्वी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्याकडे लेखी पत्र देऊन त्याबाबत कळवावे. हे नियम बंधनकारक आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ ही सकाळी साडेदहा ते सायंकाळी ५ अशी राहील. अर्ध्या दिवसाची शाळा सकाळी ९ ते दुपारी दीडपर्यंत भरेल. शाळेचे कामकाज असणाऱ्या दिवशी ६० मिनिटांची मोठी सुट्टी तर पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात १० मिनिटाच्या दोन सुट्ट्या मिळतील. दोन शिफ्टमध्ये शाळा भरत असेल तर १० मिनिटांची लहान व ३५ मिनिटांची मोठी सुट्टी घेता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.