Ravindra Chavan On Maharashtra Sadan In Kashmir  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Sadan: काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

सायली खांडेकर

हिरा ठाकणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्य शासनाच्या वतीने काश्मीरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. त्यादृष्टीने काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी विभागाच्या वतीने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

या संदर्भात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर सरकारने बडगाम जिल्ह्यातील इच्चगाम तालुक्यातील २.५० एकर (२० कॅनल) जमीन राज्य सरकारला तेथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी प्रदान केलेली आहे.

जमीन खरेदीची प्रक्रिया महाराष्ट्र व जम्मू-काश्मीर सरकार यांच्या वतीने पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सदन उभारण्याच्या दृष्टीने दोन्ही राज्यात आवश्यक प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आता या भूखंडावरील त्या जागेवर उभे राहणारे महाराष्ट्र सदन कसे असावे व त्यामध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतील याचे नियोजन व आराखड्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र सदन उभारणीच्या कामाला सुरुवात होईल व लवकरच काश्मिरमध्ये महाराष्ट्र सदन उभे राहील, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. बडगाम येथे राज्य सरकारच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सदनासाठी आवश्यक असलेल्या २.५० एकर जमिनीसाठी राज्य सरकारने ९ कोटी ३० लाख २४ हजार रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT