Bombay High Court acquits Chavanakar brothers in Maharashtra Sadan construction scam, giving major relief to Chhagan Bhujbal saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन प्रकरण; बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Maharashtra Sadan Construction Scam: महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयाने चमणकर बंधूंना निर्दोष मुक्त केले. भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळल्याने माजी मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात चमणकर बंधू दोषमुक्त.

  • मुंबई उच्च न्यायालयानं हा महत्त्वाचा निकाल दिला.

  • बांधकाम घोटाळ्याच्या सर्व आरोपींना क्लीनचिट.

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याप्रकरणी चमणकर बंधूंना मुंबई उच्च न्यायालयाने दोषमुक्त केलं. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठाने कृष्णा चमणकर, प्रशांत चमणकर आणि प्रसन्न चमणकर यांना दोषमुक्त केलं. याच चमणकर बंधूंनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे बांधकाम केलं आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालाय.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. या प्रकरणी भुजबळ काही काळ तुरुंगातही गेले होते. नंतर महायुतीसोबत गेल्यानंतर छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने भुजबळांना क्लीनचिट दिली. याच प्रकरणात चमणकर बंधूंना आता दोषमुक्त करण्यात आलं.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील अंधेरीमधील ‘आरटीओ’च्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसनाची परवानगी देताना त्या बदल्यात संबंधित कंपनीकडून दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या इमारतीची पुनर्बांधणी, तसेच मुंबईत मलबार हिल येथे विश्रामगृह बांधून घेण्यासाठी राज्य सरकारने कंत्राट दिलं होतं. या कामाची कोणतीही निविदाप्रक्रिया राबवण्यात आली नाही. त्यावेळी बांधकाम मंत्री छगन भुजबळ होते.

दरम्यान काही काळाने संबंधित कंपनीने इतर विकासक कंपनीसोबत करार करत विकासाचे हक्क विकले. राज्य सरकारच्या निकषांप्रमाणे कंत्राटदार आस्थापनाला २० टक्के नफा अपेक्षित असताना पहिल्या विकासकाला ८० टक्के नफा मिळाल्याचा आरोप केला गेला. यामध्ये आस्थापनाने १९० कोटी रुपयांचा नफा कमावला होता. त्यातील १३ कोटी ५० लाख रुपये आस्थापनाने भुजबळ कुटुंबीयांना दिले, असा आरोप भ्रष्टाचारविरोधी पथकाने केला होता.

सन २००५ ध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता याप्रकरणी विकासकाची नेमणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर पीएमएलए अंतर्गत याप्रकरणी ईडीनंही कारवाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT