Sangli Junior Engineer: कनिष्ठ अभियंता मृत्यू प्रकरण; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या अडचणी वाढणार?

Sangli Junior Engineer Death Case: सांगलीतील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांच्या मृत्यूमुळे वाद निर्माण झाला आहे. कुटुंबाने हत्येचा आरोप केला आहे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
Sangli Junior Engineer Death Case
Family of Avdhut Wadar demands FIR against BJP MLA Gopichand Padalkar in Sangli engineer death case.saam tv
Published On
Summary
  • सांगलीत कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह कृष्णा नदीत आढळला.

  • कुटुंबियांनी मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप केला.

  • भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

  • गुन्हा दाखल न झाल्यास कुटुंबाने आत्मदहनाचा इशारा दिला.

सांगलीमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार मृत्यू प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पडळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यक विरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा अवधूत वडार यांच्या कुटु्ंबियांनी दिलाय.

Sangli Junior Engineer Death Case
Deputy Sarpanch Death: डान्सरचा नाद, उपसरपंचाचा घात; गोविंद बर्गेंनी स्वत:वरच का गोळ्या झाडल्या? नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या कृष्णा नदीमध्ये जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळून आला होता. कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झालाय, असा आरोप अवधूत वडार यांच्या कुटुंबियांनी केलाय. याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केलीय. जर गुन्हा दाखल केला नाहीतर आत्महत्या करू असा इशारा अभियंत्याच्या कुटुंबियांनी दिलाय.

Sangli Junior Engineer Death Case
Beed Crime Govind Barge Death: आत्महत्येपूर्वी गोविंद बर्गेंचा एकाला व्हिडिओ कॉल, घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं, नवी माहिती समोर

अभियंता अवधूत वडार यांचा मानसिक छळ केला जात होता, असा आरोप त्यांनी केलाय. बिल काढण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांसह त्यांचे स्वीय सहाय्यक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ करण्यात आला. यातूनच हा घातपात घडल्याचा आरोप देखील मृत वडार कुटुंबाकडून करण्यात आलाय.

दरम्यान याप्रकरणी संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर कुटुंबासह आत्महत्या करू,असा इशारा मृत अभियंत्याची बहीण रविना वडार यांनी दिलाय. दरम्यान शहर पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून जतमधील महिला माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पती असलेले सुनील पवार, आमदाराचा पीए म्हणवणारा एकजण आणि जतच्या पंचायत समितीमधील इतर कर्मचाऱ्यांकडून अवधूतवर दबाव टाकला जात होता, असा आरोप अभियंत्याच्या कुटुंबाने केलाय.

अवधूत या दबावामुळे काही दिवसांपासून तणावात होता. त्याचे मानसिक संतुलन देखील बिघडले होते, असा आरोप अवधूतच्या चुलत्याने केला होता. याच कारणातून अवधूतने आत्महत्या केली असावी किंवा त्याचा घातपात झाला असावा असाही संशय कुटुंबांनी व्यक्त केलाय. जोपर्यंत जतमधील ज्याच्या विरोधात आम्ही तक्रार दिलीय त्या व्यक्तींच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा त्याच्या कुटुंबांने घेतला आहे.

शुक्रवारी अवधूत वडार हे जत येथून निघाले होते. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घराकडे परतले नाहीत. यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना सांगलीमधील बायपास रस्त्यावरील पुलाखाली एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रेस्क्यू टीमने नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढला. पोलिसानी तपास केल्यानंतर कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा असल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com