महाराष्ट्र

Coronavirus: महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची एन्ट्री; 3 वर्षानंतर पुन्हा रुग्ण का आढळत आहेत?

Corona Virus Returns In Maharashtra: देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. महाराष्ट्रातही या व्हायरसचा पुन्हा एकदा शिरकाव झालाय. नवीन रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८ वर पोहोचलीय.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्रात जुलै महिन्यात २१ नवीन कोरोना रुग्ण आढळले.

  • राज्यातील एकूण कोविड रुग्णसंख्या ४८ वर पोहोचली आहे.

  • पुणे शहरात गेल्या काही दिवसांत संसर्गाचा वेग वाढल्याचे दिसून आले.

देशभरात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढू लागलीय.आंध्र प्रदेशनंतर आता या व्हायरसनं महाराष्ट्रातही एन्ट्री केलीय. तीन वर्षांनंतर या व्हायरसची प्रकरणं आढळून येत आहेत. जुलै महिन्यात महाराष्ट्रात २१ नवीन रुग्ण आढळलेत. गेल्या दहा दिवसांत पुण्यात या व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतोय. सध्या धोका फारसा नसला तरी, रुग्णांमध्ये कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे लोकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांनी विषाणूजन्य संसर्ग (व्हायरल इन्फेक्शन) झालेल्या व्यक्तींपासून दूर राहण्याचा सल्लाही लोकांना दिलाय.

कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या ४८ वर

महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या आता ४८ वर पोहोचलीय. जानेवारी महिन्यात राज्यात ३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये १ आणि जूनमध्ये ११ रुग्ण नोंद करण्यात आली. तर जुलैच्या पहिल्या १८ दिवसांत २१ रुग्ण आढळून आलेत.

या व्हायरसवर गेल्या तीन वर्षांपासून देखरेख ठेवली जात होती. पंरतु व्हायरसची लक्षण दिसून येत नव्हती. मात्र, २०२६ मध्ये रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ झाली आहे. देशात या व्हायरसचा पुन्हा प्रसार जरी मोठ्या प्रमाणावर होत नसला, तरी ती नक्कीच चिंतेची बाब आहे.

कोरोना रुग्ण आढळून येताहेत

आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, इतर आजारांसाठी केल्या जाणाऱ्या तपासण्यांदरम्यान कोविड-१९ ची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध आजारांसाठी चाचण्या करून घेणाऱ्या रुग्णांमध्ये या व्हायरसची लागण झाल्याचं दिसून येत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस आता एका प्रकारच्या इन्फ्लूएंझासारखा झाला. तो कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना प्रामुख्याने लक्ष्य करतो. जगाच्या विविध भागांत नवीन प्रकार (व्हेरियंट्स) उदयास येत असल्याने दर एक-दोन वर्षांनी कोविड-१९ च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होणे ही एक स्वाभाविक बाब आहे.

कोविड-१९ बाबत तज्ज्ञ काय म्हणताय?

महाराष्ट्रातील जहांगीर हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. पियुष चौधरी यांच्या मते, जर इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. सध्याच्या कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये जो ओमिक्रॉन व्हेरियंटपेक्षा कमी तीव्र आहे. सहसा खोकला, सर्दी, घसा खवखवणे आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे रुग्णांना ३ ते ५ दिवस अस्वस्थ वाटू लागतं. दरम्यान अशा रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते, कारण सौम्य स्वरूपाच्या विषाणूजन्य संसर्गासाठी लोक अनेकदा चाचणी करून घेत नाहीत. इन्फ्लूएंझाप्रमाणेच आता कोविडही कायमस्वरूपी राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Glowing Skin Tips: फ्रिजमधील या ४ गोष्टींनी परत मिळवा त्वचेचा हरवलेला ग्लो; जाणून घ्या ७ सोपे उपाय

काळजाचा थरकाप! जेजुरीत खेळता खेळता दीड वर्षाच्या चिमुकला अचानक गायब झाला, सगळीकडे शोधाशोध, सेफ्टी टँककडे नजर जाताच पालकांना...

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये ठाकरे सेनेचे रामरक्षा आंदोलन

KDMC डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द; पोलिसांसमोर सरेंडर होणार

World's first website: इंटरनेटवरील सर्वात पहिली वेबसाईट कोणती होती?

SCROLL FOR NEXT