MAHARASHTRA WEATHER UPDATE Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rainfall: पुढचे ५ दिवस तुफान पावसाचे, विजांचा कडकडाट अन् वादळी वारे; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

MAHARASHTRA WEATHER UPDATE: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे असणार आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगटासह मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Priya More
  • पुढील ५ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

  • पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाट येथे रेड अलर्ट

  • अनेक जिल्ह्यांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

  • नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

यंदा मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला. मान्सून उशिरा आल्यामुळे यंदा पाऊस कमी पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण गेल्या ५ दिवसांपासून पाऊस राज्यात धुमाकूळ घालत आहे. या पाच दिवसांत मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती आहे. संपूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस पडणार होता तेवढा पाऊस १ ते ६ जुलै या कालावधीत पडला. राज्यात पाऊसाचा कहर सुरूच आहे. अशाच हवामान खात्याने पुढचे ६ दिवस महत्वाचे असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात ८ जुलै ते १२ जुलै या कालावधीत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या कालावधील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

८ जुलै -

येलो अलर्ट - नुंदरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर,

अहिल्यानगर, बुलडाणा, अकोला, अमरावती,

वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, पुणे.

येलो अलर्ट - ठाणे , मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक

रेड अलर्ट - पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट.

९ जुलै -

येलो अलर्ट - नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर,

रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, नाशिक

घाट, पालघर.

ऑरेंज अलर्ट - सातारा घाट, पुणे घाट.

१० जुलै-

येलो अलर्ट - नागपुर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया,

गडचिरोली.

११ जुलै-

येलो अलर्ट - नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया,

गडचिरोली.

१२ जुलै-

येलो अलर्ट - नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ,

वाशिम, अमरावती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गजानन महाराजांच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन

जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्त्यावरील वाहतूक बंद, पर्यटनस्थळांवर प्रवेश बंदी; काय आहे कारण?

पावसाळ्यात संध्याकाळी नाश्त्याला बनवा कुरकुरीत भेंडीची भजी; हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Badlapur: बदलापूर हादरले! उल्हास नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या, थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

Stomach Cancer: अचानक हे 5 बदल दिसले तर समजा शरीरात पोटाच्या कॅन्सरची होतेय सुरुवात

SCROLL FOR NEXT