Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: राज्यात पुढचे ५ दिवस पडणार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

IMD Alert: राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Heavy to Heavy Rainfall) पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Priya More

Mumbai News: राज्यात मान्सूनने (Monsoon 2023) चांगलाच जोर धरला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. अशामध्ये राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (Heavy to Heavy Rainfall) पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहिल. राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन (IMD Alert) करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सहाही जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणासोबत मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. याठिकाणी हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाड्यामध्ये हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे.

पुढील 24 तासांसाठी पुण्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यातील शहरी भागात हवामान ढगाळ राहील आणि हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. २४ तासांनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. तर शहरी भागातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतही येत्या तीन ते चार दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. मात्र, 6 जुलै रोजी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसात किंचितशी घट होण्याची शक्यता आहे. विदर्भ उपविभागासाठी पुढील 24 तासांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 6 जुलैपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील उपविभागांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT