Maharashtra Rain Update  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, कुठे काय परिस्थिती? पाहा एका क्लिकवर

Priya More

राज्यात मान्सूनचे (Monsoon 2024) आगमन झाले असून कोकणानंतर मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) पडत आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे. तर साऱ्यामध्ये घरांचे पत्रे उडाले आणि होर्डिंग देखील पडल्याची घटना घडली आहे. राज्यामुळे पावसामुळे कुठे काय परिस्थिती हे आपण जाणून घेणार आहोत...

पंढरपूर -

पंढरपूर शहराला आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपून काढले. दोन तासापासून शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शहरातील दोन्ही रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने उपनगराकडे जाणारे रस्ते बंद झाले आहेत. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.

नांदेड -

नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण कायम होते. सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून नागरिकाना देखील उकड्यापासून दिलासा मिळाला आहे.

सातारा -

कोरेगाव येथील लक्ष्मीनगर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अख्खे पत्र्याचे शेडच उडून गेले. जवळ जवळ २०० मीटरपर्यंत हा पत्रा उडून पडल्यामुळे रस्त्यावरून जाणारे दोन जण या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. आज दुपारी अचानक सातारा शहर आणि ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग दोन ते अडीच तास ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे परिसरातील ओढे-नाले ओसंडून वाहू लागले. मागील दोन महिन्यापासून या भागांमध्ये पाणीटंचाईला सामना करावा लागत होता. परंतु गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसाने या भागातील ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे नागरिक आनंदी झाले आहेत.

पुणे -

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसराला आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपलं. सलग तिसऱ्या दिवशी पडलेल्या या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. तर दुसरीकडे जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी, आळेफाटा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले आहे. पिंपळवंडी येथील शेतकऱ्यांची केळीची बाग भुईसपाट झालीय. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय.

सिंधुदुर्ग -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग या सह्याद्री पट्ट्यातील तालुक्यात पावसाचा जोर असून देवगड, मालवण आणि वेंगुर्ल्यातील किनारपट्टी भागात काळोख दाटला आहे. गेल्या तासाभरापासून पावसाच्या सरी कोसळत असून हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने कोकणासाठी आज यलो अलर्ट दिला आहे. तर उद्या आणि परवासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

लातूर -

लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रेनापुर, निलंगा, उदगीर ,चाकूर, शिरूर-अनंतपाळ या भागात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मात्र पेरणीयोग्य पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करू नये असे आव्हान जिल्हा कृषी अधीक्षक यांनी केले आहे.

गोंदिया -

गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले होते. मान्सूनचे आगमन केव्हा होणार याची प्रतीक्षा नागरिक करत होते. काल मृग नक्षत्राच्या प्रारंभातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांना उकडापासून निश्चितच दिलासा मिळाला होता. मात्र, आज दुपारी पुन्हा उन्हाचा तडाखा बसला. त्यानंतर संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडासह आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा आला आहे. मान्सूनपूर्व पाऊस पडल्याने आता शेतीच्या कामाला वेग येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT