संजय जाधव, प्रतिनिधी
गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पाऊसही पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून नागपूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यालाही पावसाचा जोरदार तडाखा बसला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात काही भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात पशू हानी व वित्तहानी झाली आहे. नांदुरा तालुक्यातील लोणवडी, खडदगाव, पिंपळखुटा धांडे व माळेगाव गोंड या चार गावात ढगफुटीसदृश पावसामुळे शेतांमध्ये पाणी शिरले.
नदी व नाल्याच्या काठावरील जमिनी खरडून गेल्या, तर लोणवाडी व खडदगाव येथील जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील वडनेर परिसरात एक तासात ८१.५ मिमी, तर महाळुंगे परिसरात ८० मिमी पावसाची नोंद झाली.
या पावसामुळे १२५ घरांची पडझड, तर ७६ जनावरे वाहून गेल्याची माहिती तहसीलदार दिगंबर मुकुंदे यांनी दिली. मुसळधार पावसाने लोणवाडी गावातील नदीला आलेल्या पुरात काठावर बांधलेल्या ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच नदीवर असलेला लघुसिंचन प्रकल्प भरला आहे. त्यामुळे शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून. अनेक गावांमध्ये शेती ही खरडून गेल्याने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.