Farmer Pray for Rain Saam TV
महाराष्ट्र

Farmer Pray for Rain: राज्यावर दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा, पावासासाठी देव ठेवले पाण्यात

Maharashtra Rain Update: लाखो रुपये खर्च करून पिकं उभी केली परंतु पाऊस नसल्यानं ते जळू लागली आहेत.

Ruchika Jadhav

भरत जाधव

Rain Update:

अमरावती : वरुणराजानं पाठ फिरवल्यामुळे राज्यभरावर दुष्काळाचं (Drought)सावट निर्माण झालंय. शेतातील पिकं (crops)करपू लागल्यानं बळीराजा चिंतेत पडलाय. अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या एका महिन्यापासून पावसाने (rain)दडी मारलीय. पाऊस नसल्यामुळे येथील सोयाबीन(soyabean),तूर, कपाशीचे(cotton)पिकं करपू लागली आहेत. लाखो रुपये खर्च करून पिकं उभी केली परंतु पाऊस नसल्यानं ते जळू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यानं त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय. पाऊस पडावा म्हणून गावकरी आता देवाला साकडं घालत आहेत. (Latest News On Rain)

दागिने गहाण ठेवून पिके उभे केली

पाऊस कमी झाल्यामुळे जमिनीला मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. मोठा पैसा खर्च करून शेतकऱ्यांनी (farmer)शेतात पिकं उभी केली. परंतु पाऊस नसल्यानं सोन्यासारखी पिके जळून खाक होत आहेत. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढलं. तर काही शेतकऱ्यांनी पत्नीच्या अंगावरील दागिने गहाण ठेवून शेतात पिके उभे केली. मात्र आता गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झालाय.

१००% पीक विमा लागू करावा

अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान दर्यापूर अंजनगाव सुर्जी या तालुक्यात दिसून येत आहे. तेथील स्थानिक आमदार बळवंत वानखडे यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासनाने १००% पीक विमा लागू करावा. तसेच शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी यादरम्यान केली.

ग्रामीण भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्न

नंदुरबार जिल्ह्यातदेखील गेल्या महिन्याभरापासून पाऊस पडला नाही. यामुळे तेथील पिकं करपू लागली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या उद्भवू लागलीय. पाऊस पडावा यासाठी नागरिक देवाला साकडं घालत आहेत. शेतकऱ्यांना जीवदान मिळावे. ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून नंदुरबारातील प्रकाशा या गावातील शेतकऱ्यांनी पुरातन मंदिरातील निळकंठेश्वर महादेवाला साकडं घातलं. गावकऱ्यांनी मंदिरात पाण्यात भरले असून देवाला पाण्यात ठेवलंय. जोपर्यंत समाधानकारक पाऊस होणार नाही, तोपर्यंत मंदिरातील पाणी काढणार नाही, असा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OTT Releases: वीकेंडचा काही प्लॅन नाही? मग घरीच OTT वरच्या 'या' ७ जबरदस्त वेब सिरीजचा आनंद घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

Rajasthan Sandstorm viral Video : भरदिवसा पडला रात्रीसारखा अंधार; थरकाप उडवणारं रेतीचं वादळ, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT