संजय जाधव, साम टीव्ही
Buldhana Flood Viral Video: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसला असून शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस झाला. पावसामुळे भर उन्हाळ्यात नदी नाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्यात ५ गाई वाहून गेल्याची घटना घडली. (Breaking Marathi News)
अजिंठ्याच्या डोंगरदऱ्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसाने बुलडाण्यातील (Buldhana) जामठी गावातील ओढ्याला आला पूर आला. ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे शेतातून गावाकडे जाणारी काही गुरे बघता-बघता या पुराच्या पाण्यात वाहून गेली. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता, की काही जनावरे ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याच वेळी ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अचानक प्रवाह वाढल्याने ५ गाई वाहून गेल्या आहेत. दरम्यान, भर उन्हाळ्यात नदी ओढ्याना पूर आल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. धाड परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने बाणगंगा नदीला मोठा पूर आला असून नदी काठावरील काही घरात पाणी शिरलं आहे. तर काही कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आल आहे.
जालना जिल्ह्यात सलग ५ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील काही गावांना गारपीटीचा तडाखा देखील बसला आहे. भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव महसूल मंडळातील अनेक गावात शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी साचले असून सोंगून ठेवलेली मका अक्षरशः पाण्यात भिजली आहे.
राज्यातील काही भागांत येत्या दोन ते तीन तासांत पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होईल, असा अंदाज (Weather Updates) हवामान खात्याने वर्तवला आहे. तसं ट्विट सुद्धा हवामान तज्ज्ञ केएस होसळीकर यांनी केलं आहे. होसळीकर यांच्या अंदाजनुसार, राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागांमध्ये येत्या दोन ते तीन तासांत वादळी वाऱ्यासह गारपीट होईल.
दुसरीकडे नाशिक , जालना भागात गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील काही दिवसांत अवकाळीने नाशिकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता होसळीकर यांनी येत्या दोन ते तीन तासांत मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिल्याने बळीराजाच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.