काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक,पुणे, कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यामध्ये खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. दुसरीकडे नाशिकमध्येही गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून गंगापूर धरणातून रात्री दहा वाजल्यापासून 8424 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाच्या धुवाँधार बॅटिंगमुळे गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा पूर आला असून रामकुंड आणि गोदा घाटावरील अनेक मंदिरे, बुधा घाटावरील छोटे पूलदेखील पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. तसेच पाण्याची पातळी वाढल्याने रात्री उशिरा रामकुंड परिसरातील दुकाने प्रशासनाने हलवली आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता असून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यामध्येही कालपासून पावसाची संततधार सुरू असून शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू असून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल संध्याकाळपासून खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर डेक्कनला झेड ब्रिज पाणी भरल त्याला अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
गेले तीन दिवसांपासून कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून राधानगरी धरणाच्या दरवाजातून भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मुकसबा बावडा परिसरातील राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने वडणगे कसबा बावडा मार्ग बंद झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोरच्या अंजनासागर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. आज दिवसभर मुसळधार पावसामुळे अंजना नदीला पूर आला आहे. यामुळे पळशी व देवपुळ गावाजवळील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला होता. तीन दिवसांच्या जोरदार पावसाने पावसाची तूट भरून निघाली.
धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. वाशी,कळंब,धाराशिव व तुळजापूर सह जिल्ह्यात या पावसानं जोरदार हजेरी लावली या पावसानं वाशी तालुक्यातील फक्राबाद गावचा संपर्क फक्राबाद येथील पुलावर पाणी आल्याने तुटला आहे.गेली अनेक दिवसापासून या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गावकरी करत आहेत मात्र ती उंची वाढवली जात नसल्याने बीड जिल्ह्यात किंवा मांजरा नदीला पावसाचे पाणी आले की या गावचा संपर्क तुटतो याही वेळी मांजरा नदीला पाणी आल्याने या गावचा संपर्क तुटला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.