संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झालाय. पुढील ५ ते ७ दिवस राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत असून, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणमध्ये काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातल्या अनेक भागांत पुढील ४ ते ५ दिवस काही ठिकाणी रेड अलर्ट, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. पुण्यात पुढील चार ते पाच दिवस दमदार पाऊस होईल, असा अंदाज आहे.
मान्सून राज्यात सक्रिय झाला आहे. पुढील पाच ते सात दिवस सर्वदूर पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकणात काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागातही पाऊस सुरू आहे.
३ जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने पावसाची स्थिती पुढील काही दिवस कायम राहील, असा अंदाज आहे. घाटमाथ्यमावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. २ ते ४ जुलै दरम्यान पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील ४८ तासांत चांगला पाऊस झाला आहे. पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी ही माहिती दिली.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज, बुधवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्यापासून म्हणजेच २ जुलैपासून ५ तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या रत्नागिरीच्या काही भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटावर आणि कोकणात या कालावधीत दरडी कोसळण्याचा धोकाही आहे, असे सांगण्यात आले.
सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. किनारपट्टी भागांत वेगवान वारे वाहतील. मच्छिमारांनी या काळात समुद्र किंवा खाडी किनाऱ्यावर मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यासाठी उद्या, गुरुवारी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. खबरदारी म्हणून पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी यासंदर्भात आदेश दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.