Maharashtra Rain Alert  Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : नागरिकांनो काळजी घ्या! मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा अलर्ट, २४ तासांत धो-धो बरसणार

Maharashtra Rain Alert : राज्यातील काही भागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Prashant Patil

मुंबई : राज्यातील काही भागात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने कोकणातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली असून, रेड अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाण्यासह इतर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पुढील २४ तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल. १५ आणि १६ जून रोजी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्गला १६ जून रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. १४ आणि १५ जून रोजी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. विजांच्या कडकडाटासह ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असे हवामान विभागानं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT