Raigad News  Saam Tv
महाराष्ट्र

Teacher Transfer : जिल्हा परिषदेची शाळा जगात पहिल्या नंबरला, तरीही वारे गुरुजींवर बदलीचं संकट

Khed Teacher Transfer : खेडमधील दत्तात्रय वारे गुरुजी यांची बदली मावळ तालुक्यातील दुर्गम भागात झाल्याने पालक आणि शिक्षक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी बदलीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Alisha Khedekar

  • जालिंदरनगरच्या दत्तात्रय वारे गुरुजींची बदली मावळच्या दुर्गम भागात करण्यात आली आहे

  • पालक आणि शिक्षक वर्गाकडून शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठली आहे

  • ग्रामस्थांनी वारे गुरुजींच्या समर्थनार्थ आंदोलनाचा इशारा दिला आहे

  • शिक्षणमंत्री दादा भुसे स्वतः शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत

खेड तालुक्यातील एका शिक्षकाच्या बदलीमुळे गावातील पालकांचा आणि इतर शिक्षकांचा राग अनावर झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील जालिंदरनगर शाळेनं इंग्लंडमध्ये झालेल्या T4 Education स्पर्धेत जगात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामागे असलेल्या दत्तात्रय वारे गुरुजींची नुकतीच प्रस्तावित बदली मावळ तालुक्यातील दुर्गम भागात झाली आहे. शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर आता टीकेची झोड उठली आहे.

शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेचा शैक्षणिक दर्जा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता एका वेगळ्या उंचीवर नेणारे दत्तात्रय वारे गुरुजी हे नाव शिक्षण क्षेत्रात आदरानं घेतलं जातं. वारे गुरुजींवर झालेल्या आरोपांनंतर त्यांची बदली दुर्लक्षित असलेल्या जालिंदरनगर शाळेत करण्यात आली होती.

मात्र, त्यांनी त्या शाळेलाही जागतिक दर्जा मिळवून देत T4 Education स्पर्धेत जगात पहिला क्रमांक मिळवून दिला. आता पुन्हा त्यांची बदली करण्यात येत असल्याने शिक्षकवर्गातून संताप व्यक्त केला जातो आहे. आता जालिंदरनगरचे ग्रामस्थांनी वारे गुरुजींच्या पाठीशी ठामपणे उभे रहावुन बदली विरोधात मोठा लढा उभा करणार असल्याचे म्हणत शिक्षण विभागाला इशारा दिलाय आहे.

दुर्गम भागातील शिक्षकांच्या सततच्या बदलीने पालकवर्ग संतप्त झाला आहे. तर विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या साखळी बदली प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच शिक्षणमंत्री दादा भुसे आज वाबळेवाडी आणि जालिंदरनगर शाळेची पाहणी करणार आहेत. त्यामुळे वारे गुरुजींवरील बदलीचं संकट दूर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भररस्त्यात भांडणं करून टेम्पोची तोडफोड करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Shocking : बंद फ्लॅटमधून दुर्गंधी, दरवाजा तोडला, आतील दृश्य बघून सगळेच हादरले; आई आणि ४ मुलं निपचित पडली होती...

Maharashtra Politics: ते पाकिस्तानलाही सोबत घेतील; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा,ऑक्टोबरचे ₹१५०० कधी येणार?

Crime : चहासाठी घरी बोलवलं, काकांनी प्लान आखला होता, पुतण्या घरी येताच निर्दयीपणे संपवलं

SCROLL FOR NEXT