mpsc, mpsc news, maharashtra saam tv
महाराष्ट्र

MPSC : जाणून घ्या; एमपीएससीनं भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या कार्यपद्धतीत केलेला बदल

भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प सादर करण्यासंदर्भातील उपरोक्त कार्यपद्धत केवळ स्पर्धा परीक्षांकरीता लागू राहील.

साम न्यूज नेटवर्क

Maharashtra Public Service Commission Opting Out News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (mpsc) विविध स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करुन देण्याच्या निर्णय घेतला हाेता. या निर्णयाच्या फलनिष्पतीचा साकल्याने विचार करून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting out) कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. त्याबाबतची माहिती आयाेगानं संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

उमेदवारांना भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबतचा सदर निर्णय सर्व प्रलंबित तसेच यापुढील सर्व स्पर्धा परीक्षांच्या (mpsc exam) निकाल प्रक्रियेपासून लागू राहील. तसेच, त्याप्रमाणे आयोगाच्या कार्य नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात येईल. सदर सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीत कार्यनियमावलीमध्ये सुधारणा झाली आहे असे समजून प्रक्रिया सुरु करण्यात येईल असे म्हटलं आहे.

विद्यमान कार्यपध्दतीनुसार सर्व भरतीप्रक्रियेकरीता अंतिम शिफारशीपूर्वी सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

स्पर्धा परीक्षेद्वारे बहुसंवर्गीय भरतीप्रक्रियेकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रथम संवर्गाचा पसंतीक्रम सादर करण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

स्पर्धा परीक्षेद्वारे बहुसंवर्गीय भरती प्रवेशाकरीता संबंधित उमेदवाराकडून प्राप्त पसंतीक्रमाच्या आधारे प्रचलित पध्दतीनुसार तात्पुरती निवड यादी (Provisional Sclection List) तयार करण्यात येईल.

बहुसंवर्गीय भरतीप्रक्रिया नसलेल्या स्पर्धा परीक्षांकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रचलित पध्दतीनुसार तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) तयार करण्यात येईल.

तात्पुरती निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्याच्या आधारे भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांना ७ दिवसांचा कालावधी देण्यात येईल.

तात्पुरती निवड यादी तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर केलेल्या उमेदवारांचा विदा (Data) लक्षात घेऊन अंतिम शिफारस यादी (Final Recommendation List) तयार करण्यात येईल.

बहुसंवर्गीय भरतीप्रक्रियेकरीता पदांचे पसंतीक्रम सादर करणे तसेच सर्व स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीप्रक्रियेकरीता भरतीप्रक्रियेतून बाहेर पडणे याबाबतची कार्यवाही फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विहित कालावधीमध्ये करणे अनिवार्य असेल. यासंदर्भातील इतर कोणत्याही पद्धतीने केलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.

भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प सादर करण्यासंदर्भातील उपरोक्त कार्यपद्धत केवळ स्पर्धा परीक्षांकरीता लागू राहील. विशिष्ट अहंता विशिष्ट अनुभव आधारित सरळसेवा भरतीकरोता उपरोक्त निर्णय लागू करण्यात येणार नाही.

भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबतचा सदर निर्णय सर्व प्रलंबित तसेच यापुढील सर्व स्पर्धा परीक्षांच्या निकाल प्रक्रियेपासून लागू राहील. तसेच, त्याप्रमाणे आयोगाच्या कार्य नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात येईल. सदर सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीत कार्यनियमावलीमध्ये सुधारणा झाली आहे असे समजून प्रक्रिया सुरु करण्यात येईल असं आयाेगानं पत्रकात म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT