Pune Mumbai Express Way : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार व्हावेत तसेच त्यांचे जीव वाचावेत यासाठी लोणावळ्यातील वलवण येथे असलेल्या कुसगाव टोलनाक्याजवळील (toll plaza) जागेत ट्रॉमा केअर सेंटर उभारावे अशी मागणी लोणावळ्याचे (lonavala) माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली.
काही दिवसांपूर्वी शिवसंग्राम संघटनेचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. अपघातानंतर त्यांना सुमारे एक तास तातडीची मदत मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर एक्सप्रेस वे वरील अपघात आणि त्यात होणारे मृत्यूचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एक्सप्रेस वेवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सध्या बोरघाटात एक्सप्रेस वे वर रुंदीकरण, दुरुस्तीसह मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळेही अपघातामध्ये वाढ झाली आहे. अपघातामधील जखमींना वेळेमध्ये योग्य उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो असं श्रीधर पुजारी यांनी नमूद केलं. ते म्हणाले अपघात झाल्यास रुग्णांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालय, सोमाटने, निगडी येथील खाजगी रुग्णालयाचा पर्याय होता. ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित होत आहे. मात्र अपघातानंतर दिरंगाई झाली तर रुग्णाचा जीव जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे जखमींवर वेळीच उपचार होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
वलवन येथील एक्सप्रेस हायवेवर कुसगाव टोल नाक्याच्या शेजारील रस्ते विकास महामंडळाची वास्तू अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे. प्रशस्त आणि मार्गालगत असल्याने या वास्तूचा सोईस्कर वापर होऊ शकतो.
हजारो नागरिकांना या मार्गावर केवळ वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी मध्यवर्ती असलेला लोणावळा शहरामध्ये ट्रॉमा केअर सेंटर होणे गरजेचे आहे असे मत श्रीधर पुजारी आणि सुरेखा जाधव यांनी व्यक्त केलं.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.