Ravi Rana Vs Abhijit Adsul Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अमरावतीत पुन्हा राणा Vs अडसूळ वाद पेटला, एकमेकांविरोधात देणार उमेदवार

Ravi Rana Vs Abhijit Adsul: अभिजीत अडसूळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दर्यापूर मतदारसंघातून रवी राणा यांनी आपल्या पक्षाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

Priya More

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमरावतीमध्ये पुन्हा रवी राणा विरूद्ध अभिजीत अडसूळ यांच्यातील वाद पेटला आहे. नुकताच अभिजीत अडसूळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता रवी राणा यांनी आपल्या पक्षाकडून अभिजीत अडसूळ यांच्याविरोधात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघामध्ये माहायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अभिजीत अडसूळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर आमदार रवी राणा यांनी भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना आपल्या पक्षात घेतले. युवा स्वाभिमान पक्षातर्फे आज रमेश बुंदिले दर्यापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे राणा विरुद्ध अडसूळ हा वाद पुन्हा पेटला आहे.

दर्यापूर मतदारसंघात आमदार रवी राणा हे उमेदवार उभे करत असल्याने आम्ही सुद्धा आमदार रवी राणा यांच्याविरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा राणा विरुद्ध अडसूळ हा वाद पेटल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे अमरावतीमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

'महायुतीचा उमेदवार असताना उमेदवार देणे हे पाप आहे आणि हे पाप जर ते करत असतील तर ते महायुतीतून बाहेर फेकले जातील. त्यामुळे राणा यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला नाही तर आम्ही रवी राणा यांच्या बडनेरा मतदारसंघात त्यांच्या विरोधातही उमेदवार देऊ किंवा सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ.' असा इशारा अभिजीत अडसूळ यांनी रवी राणा यांना दिला आहे. आता रवी राणा नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

SCROLL FOR NEXT