Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: हातकणंगले मतदारसंघात राजकारण तापलं , राजू शेट्टींच्या मतदारसंघावर सदाभाऊ खोत यांचा दावा

Maharashtra Politics News: लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय वादळ घोंगावू लागलंय. सदाभाऊ खोत यांनी देखील या जागेवर आपला दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजकीय वादळ घोंगावू लागलंय. या मतदार संघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरुद्ध आता पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शड्डू ठोकून उभे ठाकले आहेत. तर सदाभाऊ खोत यांनी देखील या जागेवर आपला दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं विशेष लक्ष लागलं आहे.

मतदारसंघ 1..दावेदार 4

शेतकरी संघटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे असतं. मतदार संघात तीन तगडे उमेदवार आहेत. त्यामध्ये शिवसेना गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, एकेकाळचे राजू शेट्टीचे मित्र आणि सध्या रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे. तर शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून इच्छुक उमेदवार रोहित पाटील असे चार उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चौरंगी लढत लागण्याची शक्यता असल्यामुळे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार धैर्यशील माने यांच्यावर मतदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपला पत्ता कापला जाऊ नये यासाठी धैर्यशील माने हे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले आहेत. कालच हातकणंगले तालुक्यात निमशिरगाव इथं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर धैर्यशील माने देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात धैर्यशील माने यांनी थेट शरद पवार आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचं भरभरून कौतुक केल्याने राजकारण्यांच्या भुया उंचावल आहेत. आमदार सतेज पाटील यांची शिरोळ तालुक्यावर देखील चांगली पकड आहे. त्यामुळे सतेज पाटील यांची कळ काढून चालत नाही असं विधानही धैर्यशील माने यांनी केलं. ऐन निवडणुकीच्या तोंडावर धैर्यशील माने यांनी धास्ती घेतली की सावध पवित्र घेतला यावर राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: रोजच्या या ४ चुकांमुळे वाढतो BP; वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

IAS Transferred: राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल; २४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या जिल्ह्यात कोण कलेक्टर? जाणून घ्या

Tissue Saree Drape Tips: टिश्यू साडी अंगावरुन निसटतेय? या टीप्स वापरुन नेसा साडी, दिसेल परफेक्ट

Maharashtra Live News Update : पालघरमध्ये बस चालकाची दादागिरी; प्रवाशावर संताप

नांदेडमध्ये मध्यरात्री रक्तरंजित गँगवॉर; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा खून, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT