Sharad Pawar  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics मोठी बातमी! शरद पवार NDA सोबत? शिंदेसेनेचं वजन कमी होणार?

Sharad Pawar's Possible NDA Entry: शरद पवार एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. जर ते एनडीएमध्ये गेले तर एकनाथ शिंदे यांचे वजन कमी होण्याची शक्यता आहे.

Priya More
  • शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण

  • या चर्चांमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले

  • शरद पावार एनडीएमध्ये आल्यानंतर शिंदेंचे वजन कमी होईल

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य सहभागामुळे एनडीएमधील संख्याबळ आणि राजकीय बार्गेनिंग पॉवर वाढू शकते

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात घडू शकणाऱ्या एका अत्यंत मोठ्या आणि संभाव्य उलथापालथीची बातमी समोर आली आहे. जर शरद पवारांची राष्ट्रवादी खरोखरच एनडीएसोबत आली तर महायुतीमध्ये शिंदेसेनेचं महत्त्व कमी होणार का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण पवारांच्या रूपानं भाजपला मोठा चेहरा आणि बळ मिळाल्यास भाजपला आगामी काळात शिंदेंची तितकीशी गरज भासणार नाही. यामुळे राज्यात सत्तेत वाटेकरी वाढून शिंदेसेनेचं राजकीय वजन घटण्याचा थेट अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्या शरद पवार हे एनडीएमध्ये जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. जर शरद पवार एनडीएबरोबर जाणार असतील तर भविष्यात एकनाथ शिंदेंचे महत्व कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पाहिले तर एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रात आणि राज्यात संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. मात्र जर शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होत असेल तर राष्ट्रवादीची ताकद वाढेल आणि बार्गेनिंग पावर देखील वाढेल.

केंद्रामध्ये सध्या डिलिमिटेशन या बिलाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी ४ महिन्यात हे बिल केंद्रामध्ये चर्चेला पुन्हा येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रातील संख्याबळ हे शरद पवार यांच्या राजकीय वर्तुळामुळे आणि वजनामुळे वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मागच्या १५ तासांपासून एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे कुठेच दिसत नाहीत.

शरद पवारांच्या रुपाने किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाने जर पुन्हा एकदा एनडीएला खूप चांगला मित्र पक्ष मिळत असेल तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांचे महत्व यानिमित्ताने कमी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी आणि एनडीएसाठी शरद पवार यांचे येणं अतिशय महत्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. एनडीएमधील भाजपचा प्लान ए, प्लान बी तयार आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार जास्त आहेत. त्यामुळे एनडीएमध्ये आल्यावर त्यांची बार्गेनिंग पवार वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ₹१५०० जमा, जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आले का? लगेच अकाऊंट तपासा

Diabetes medication: सकाळी की रात्री? डायबेटीजची औषधं कधी घेतल्याने होतो फायदा?

Shah Rukh Khan: शाहरुख खानला सुप्रीम कोर्ट कडून मोठा दिलासा; मन्नतच्या कामाला विरोध करणाऱ्यांना सुनावले खडेबोल

Mumbai : राज्यात पावसाची विश्रांती, मुंबईच्या पाणीसाठ्यात १११ दशलक्ष लिटरची घट; नागरिकांची चिंता वाढली

लाडक्या नातीसाठी चांदीच्या पैंजणाचे 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT