Manikrao Kokate Resignation saam tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate Resignation: मंत्रिपद जाणार की राहणार? मंगळवारी माणिकराव कोकाटेंचं भवितव्य

Manikrao Kokate Resignation : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्याप्रकरणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीमानाबाबत विधान केलंय.

Bharat Jadhav

आपल्या विधानामुळे अडचणीत येणार राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार असल्याचा चर्चेने जोर धरलाय. अजित पवार येत्या मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळालीय. आज छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. याभेटी दरम्यान अजित पवार यांनी घाडगे यांना त्याबाबत शब्द दिलाय. तसेच सूरज चव्हाण यांना पक्षात घेणार नसल्याचही यावेळी अजित पवार यांनी म्हटलंय.

आज पुण्यात विजय घाडगे यांनी उपमुख्यंमत्री अजित पवारांची भेट घेतली. भेट झाल्यानंतर घाटगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अजित पवार आपल्याशी काय बोलले यांची माहिती घाडगे यांनी दिली. जे झालं ते अत्यंत चुकीचं झालं.

महाराष्ट्रातील राजकारणात असं व्हायला नको होतं, असं अजित पवार म्हणालेत. तर मारहाण करणाऱ्या आरोपींवर किरकोळ गुन्हे दाखल केलेत. तर काहींना सोडून दिल्याची सांगितल्यानंतर अजित पवार यांनी स्वत: लातूर पोलिसांशी चर्चा केलीय.अशी प्रकार खपवून घेतलं जाणार नाहीत, असं स्पष्टपणे त्यांनी पोलिसांना सांगितलं, असं विजय घाडगे म्हणालेत.

त्याचबरोबर अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्या निर्णयासाठी वेळ मागितला आहे,असेही घाडगे म्हणालेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा घाडगे यांनी दिला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी वेळ मागितल्याचं घाडगे म्हणाले.

सभागृहात कामकाज चालू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर येताच राज्यात वातावरण चांगलंच तापलं. विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली होती. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात गोंधळ घातला होता.

दरम्यान छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत निवेदन दिलं होतं. त्यावेळी तटकरे जेथे बसले होते त्या ठिकाणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टेबलवर पत्ते उधळले होते. यानंतर तटकरे यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावाचे कार्यकर्ते आपसात भिडले होते. यात विजय घाडगे यांना जबर मारहाण झाली होती. त्यानंतर आज घाडगे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी कोकाटेच्या राजीनाम्याबाबत शब्द दिल्याचं घाडगे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्यांना परतीचे वेध; रायगडमधून विशेष एसटी सेवा

Amravati Crime : अमरावती हादरले; मुलासह आईची निर्घृण हत्या, बदलाच्या भावनेतून घरासमोर येत केले शस्त्राने वार

Jio 3599 Vs Airtel 3599: कोणता प्रीपेड प्लॅन देतो जास्त डेटा आणि खूप फायदे?

OBC reservation issue : राज्य सरकारचा मोठा निर्णय, ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापना, आजच GR निघणार

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT