saam tv
महाराष्ट्र

भावकीनं भाजप प्रवेश थांबवला; दोन भावांमधील वाद चव्हाट्यावर आला, भरसभेत माजी मंत्र्यांवर आरोप

Solapur Politics: राजकारणातील दोन भावांमधील पुन्हा चव्हाट्यावर आलाय. माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपला भाजप प्रवेश रोखला असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी केला आहे.

Bharat Jadhav

  • शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव सावंत यांचा भाजप प्रवेश रखडलेला

  • भावामुळेच भाजप प्रवेश थांबल्याचा गंभीर आरोप

  • सावंत कुटुंबातील राजकीय मतभेद जाहीरपणे समोर

भारत नांगणे, साम प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या भाजप प्रवेशाला अजून मूर्हत गावला नाहीये. मात्र आपला भाजप प्रवेश कोणामुळे रखडला याचा खुलासा शिवाजीराव सावंत यांनी एका जाहीर सभेत केलाय. गेल्या काही दिवसांपासून शिवाजीराव सावंत यांचा भाजप प्रवेश रखडला आहे. हा प्रवेश का होत नाहीये, याचा मोठा खुलासा झालाय.

भाऊ भावकी असते, आपल्या प्रतिष्ठेसाठी भाजप प्रवेश रोखला. माझा भाऊ माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्याना सांगून माझा भाजप पक्ष प्रवेश थांबवला असा आरोप त्यांनी केलाय. भाऊ शिवाजी शिवाजी सावंत यांच्या आरोपामुळे सावंत कुटूंबातील राजकीय मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये बोलताना भाजप पक्षप्रवेश का लांबला यावर भाष्य केलं.

यावेळी शिवाजी सावंत यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला. सत्ता असल्यास काम करण्याची जिद्द असते आणि उमेद असते. त्यामुळे ते होऊन जातं. त्यामुळे आपण भाजपमध्ये जाण्याचा विचार केला. परंतु भाव-भावकी असते. आपल्या सर्वांना माहितीये की, सावंत कुटुंबामध्ये वितृष्ट आलं होतं. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की,मी तुमची मदत केली.

शिवाजीराव सावंत यांना भाजपमध्ये घेऊ नका, असं सांगून आपला भाजप प्रवेश थांबवला. त्यामुळे जिल्ह्यामध्ये काही होऊ दे पण हा भाजपमध्ये आला तर आपलं काय होईल. आपल्या जे स्थान आहे, त्यांचे काय? असा प्रश्न तानाजी सावंत यांना पडलाय, असं शिवाजीराव सावंत यांनी मेळाव्यातील भाषणात सांगितलं. दरम्यान येत्या दोन दिवसात कोणत्या पक्षातून निवडणुक लढवायची याचा निर्णय घेणार असल्याचेही शिवाजीराव सावंतानी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर फोडाफोडीला सुरुवात? शिंदे गटानंतर ठाकरेंचे ११ नगरसेवक अज्ञातस्थळी

Horoscope Monday: रागावर ठेवा नियंत्रण, 5 राशींना मिळणार नवीन संधी, पैसाही टिकेल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Kolhapur Politics: कोल्हापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरली, दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र

Guhagar Tourism : ओ नाखवा बोटीनं फिरवाल का...; गुहागरमधील 'हा' बीच परदेशी पर्यटकांनाही खुणावतो

SCROLL FOR NEXT