Malegaon Cooperative Sugar Factory  
महाराष्ट्र

Ajit Pawar: अर्थमंत्री असूनही का व्हायचं होतं कारखान्याचं चेअरमन? काय होती अजित पवारांची राजकीय खेळी?

Malegaon Cooperative Sugar Factory: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार उभे होते. चेअरमन पदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती. अर्थमंत्री असूनही एका कारखान्याच्या चेअरमन पदासाठी त्यांनी का निवडणूक का लढवली असा प्रश्न केला जात होता.

Bharat Jadhav

लोकसभा, आणि विधानसभा निवडणुकीवेळी बारामती नाव खूप चर्चेत आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर बारामती पुन्हा चर्चेत आली ते म्हणजे माळेगाव साखर कारखाना निवडणुकीमुळे. त्याचं कराणही तसेच होते. या निवडणुकीतही पवारविरुद्ध पवार अशी लढत होती. निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांची. अजित पवार हे कारखान्याच्या चेअरमन पदासाठी निवडणुकीत उभे राहिले होते.

आता खु्द्द दादाच चेअरमन पदासाठी निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं तर चर्चा तर होणारच ना!. निवडणूक झाली मतदान झालं, दादाचं पॅनल निवडून सुद्धा आलं. पण अनेकांना प्रश्न पडला होता की, अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना चेअरमन पदाची निवडणूक का लढवली? यामागे काय राजकीय गणित होतं याचं कारण खुद्द अजित पवार यांनी सांगितलंय.

राजकीय खेळीमागचे कारण काय?

माळेगाव निवडणुकीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी केली. शरद पवार गटाशी जुळवून घेण्याची भूमिकाही घेतली. स्थानिक नेत्यांसोबत चर्चा सुद्धा केली. पण त्याचा काही उपयोग होत नसल्याचं लक्षात येताच अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात वेगळा पॅनेल उभा केला. त्यानंतर त्यांनी निवडणूक प्रचारात माळेगावचा पुढचा चेअरमन मीच असेल, अशी थेट घोषणाच अजित पवारांनी केली.

त्यांच्या या निर्णयानं स्वपक्षातील स्थानिक नेत्यांनाही धक्का बसला. अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री असूनही त्यांना माळेगावचे चेअरमन का व्हायचे आहे? अशा चर्चा सर्वत्र सुरू झाल्या.

दरम्यान माळेगाव सभासदांच्या आभार मेळाव्यात अजित पवार यांनी त्या खेळीमागील कारण सांगितलंय. अजित पवार यांची ओळख रोखठोक बोलणारे आणि मनात आडपडदा न ठेवता समोरच्याला अगदी स्पष्टपणे 'होय किंवा नाही' सांगणारे नेते अशी आहे. त्यांच्या स्वभावाची प्रचिती माळेगावकरांना पुन्हा एकदा आली. अजित पवार यांनी स्वत:चे नाव कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी का जाहीर केले? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी अगदी थेटपणे दिलं.

आपण आपल्या राजकीय आयुष्यात कधीच कारखान्याची निवडणूक गांभीर्यपूर्वक घेतली नव्हती. पण पहिल्यांदाच माळेगावच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत जातीने लक्ष घातलं. माळेगावात तावरे मंडळी असल्याने मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. परंतु अण्णांच्या उत्तराने तो अयशस्वी झाल्याचं अजित पवार म्हणाले.

आधी आपल्या मनात कुठेही संचालक व्हायचं किंवा अध्यक्ष व्हायचे असं काही नव्हतं. मात्र माझ्याच जवळच्या ६ ते ७ लोकांना चेअरमन व्हायचं होतं, असं आपण ऐकल्याचं अजित पवार म्हणाले. विशेष म्हणजे अध्यक्ष होण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या रणनीतीही आखल्या होत्या. माझ्याच जवळच्या सहा-सात लोकांना चेअरमन व्हायचे असल्याने नाईलाजाने आपण आपले नाव अध्यक्षपदासाठी जाहीर केलं असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT