Baba Siddique Latest News Saam TV
महाराष्ट्र

Baba Siddique Death: 'बुलेटप्रूफ जॅकेट घालून स्वतःची सुरक्षा स्वतः करावी...', बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर काँग्रेसचा संताप

Baba Siddique Death Update: विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या घटनेनंतर सत्ताधारी आता बुलेट प्रुफ जॅकेट घालून स्वतःची सुरक्षा स्वतः करावी असे वाटते, असे म्हणत राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर

Vijay Wadettiwar On Baba Siddique Firing: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईमध्ये हत्या करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या भयंकर घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. कुर्ला परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत असतानाच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेने राजकीय वातावरणही ढवळून निघाले असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेकांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या घटनेनंतर सत्ताधारी आता बुलेट प्रुफ जॅकेट घालून स्वतःची सुरक्षा स्वतः करावी असे वाटते, असे म्हणत राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

बाबा सिद्दिकी राजकारण समाजकारणात सक्रिय असणारे नेते होते, ते काही कारणाने काँगेस सोडून अजित पवारकडे गेलेत आमदार राज्यमंत्री राहिले माझे चांगले संबंध होते.त्यांना वायप्लस सुरक्षा असताना ही घटना घडणे गंभीर बाब आहे. वारंवार घडणाऱ्या घटना पाहता कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला. सत्ताधारी नेत्यांसोबत अशी घटना घडणे म्हणजे कायद्याचा आणि पोलिसाचा धाक कुठेही राहिलेला दिसतं नाही. जर सत्ताधारी पक्षातील नेते सुरक्षित नसतील तर राज्य सुरक्षित आहे का..? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

"या घटनेचे आम्हाला दुःख आहे. त्यामुळे राज्यात कोण सुरक्षित हा प्रश्न? या घटनेनंतर आता बुलेट प्रुफ जॅकेट घालून स्वतःची सुरक्षा स्वतः करावी असे वाटते. सत्ताधारी यांनी आता जाहिरातीच्या फलकात तुमची सुरक्षा तुम्ही करा सरकार जबाबदार नाही, असे फलक जागोजागी लावले तर लोक आपापली सुरक्षा करतील अशी वेळ महाराष्ट्रावर आली. मी बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांना यामधून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

"मुंबईतील ही सहावी घटना आहे. आतापर्यंत मुंबई शांत होती. अंडरवर्ल्ड संपलं होतं, अशा स्थितीत अशा घटना घडणे म्हणजे राज्यात पोलिसांचं सरकारचं राज्य राहिले नाही. आता गुंडांचे राज्य झाले. कारण पुणे सारख्या शहरात एक मंत्री यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांच्या टोळीला पोचण्याचं काम करत असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेने नेत आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कोणती घटना असली तरी त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या घटनेमागे काय कारण आहे? हे चौकशी मधूनच पुढे येणार आहे. मात्र त्यांच्या कार्यालयासमोर गोळी झाडली जात असेल तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे," असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

Junnar : बिबट्यांनी जुन्नरकरांचं टेन्शन वाढवलं; शरद पवार गटाच्या नेत्याच्या बंगल्यात बिबट्या शिरला

Andheri Pedestrian Bridge: रेल्वेच्या पादचारी पुलावर महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी; मुंबई पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT