Shinde Group Vs bjp  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'मी सौजन्य सोडलं तर, वाईट...' रविंद्र चव्हाण रामदास कदम यांच्यावर संतापले; भाजप- शिंदे गटात जोरदार जुंपली!

Ravindra Chavan Against Ramdas Kadam Mahayuti crisis : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे गटात जुंपल्याचं दिसत आहे. रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गंभीर इशारा दिल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

अभिजित देशमुख, साम टीव्ही कल्याण

आगामी विधानसभेच्या तोंडावर महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं दिसतंय. कारण घटक पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत टीका करत असल्याचं दिसतंय. आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपन नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात चांगलीच जुंपल्याचं दिसत (Maharashtra Politics) आहे. आपण याबाबत सविस्तर जाणून घेवू या.

नेमकं काय आहे प्रकरण ?

शिवसेना नेते रामदास कदम यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रीपदाचा फडणवीस यांनी राजीनामा घ्यावा, अशी टीका एका कार्यक्रमात केली (Vidhan sabha election) होती. रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी कदम यांचा खरपूस समाचार घेतलाय. मुख्यमंत्र्यांना एवढेच सांगेन युतीधर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण यांचा नाही, तर तो सर्वांनी पाळला पाहिजे. भाजप म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे. मात्र , सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलाय.

रवींद्र चव्हाण संतापले

यावेळी बोलताना मंत्री चव्हाण यांनी रामदास कदम यांच्या मुलाच्या मतदारसंघात कोट्यवधी रुपये निधी दिलाय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ते मंत्री होते, त्यांनी कधी कोणतं काम केलं? असा प्रश्न (Ravindra Chavan Against Ramdas Kadam) विचारला. ३५ वर्षांत काहीच काम केलं नाही. कोकणासाठी काहीच केलं नाही. मोठमोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही. उद्धव ठाकरे यांना फार महत्त्व देणारं कोण राहिलं नाही, असा टोला रामदास कदम यांना लगावला.

रक्षाबंधनाचा कार्यक्रम

रक्षाबंधनानिमित्त सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीमधील सावरकर रोड येथील कार्यालयात महिलांनी एकच गर्दी केली (Shinde Group Vs bjp) होती. हजारो महिलांनी रवींद्र चव्हाण यांना राखी बांधली. यानंतर रवींद्र चव्हाण यांच्याकडून महिलांना भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान रविंद्र चव्हाण यांच्या जीवनपटावरील गाण्याचं देखील प्रकाशन करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पावसाचा झेंडूला फटका; पुण्यातील मार्केट यार्डमध्ये झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी गर्दी | VIDEO

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Kolhapur Tragedy : अग्निशमन दलाच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू तर सहा जखमी

Shocking: पोटच्या गोळ्याचे भयानक कृत्य, दारूच्या नशेत आईची हत्या, बापालाही बेदम मारलं

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT