Uddhav Thackeray And Eknath Shinde  SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेंनंतर शिंदेंचा डाव, खासगी सचिवांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी आखला प्लॅन!

Balaji Khatgaonkar: बालाजी खतगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वीच बालाजी खतगावकर यांनी खासगी सचिव पदाचाही राजीनामा दिला.

Priya More

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटाने निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणाला उतरावायचे यासाठी चाचपणी सुरू केली आहे. अशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी खासगी सचिव बालाजी खतगावकर हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी आपले खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेचे आमदार केले. त्यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे हे देखील आपले खासगी सचिव बालाजी खतगावकर यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून आमदार बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

बालाजी खतगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते. दोन महिन्यांपूर्वीच बालाजी खतगावकर यांनी खासगी सचिव पदाचाही राजीनामा दिला. ११ ऑगस्टला नांदेडच्या मुखेड मतदारसंघात बालाजी खतगावकर यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन केले. या कार्यालयाच्या उद्घाटनाला मंत्री शंभुराजे देसाई हे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या कामांशी प्रभावित होऊन बालाजी खतगावकर समाजकारणात उतरत असल्याची चर्चा आहे.

बालाजी खतगावकर यांनी राजकीय प्रवासाची सुरूवात जरी केली असली तरी मतदारसंघ अद्याप निश्चित नाही. त्यामुळे बालाजी खतगावकर यांना कोणत्या मतदार संघाची जबाबदारी दिली जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. बालाजी खतगावकर हे नांदेडच्या सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. १९८७ च्या महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन म्हणजे लोकसेवा आयोगातून पहिल्याच संधीत त्यांची निवड झाली. राज्यात विविध पदावर त्यांनी आतापर्यंत काम केले आहे. आता ते राजकीय प्रवासाला सुरूवात करणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT