Prakash Ambedkar News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha News: 'वंचित'चे महाविकास आघाडीवर दबावतंत्र? अंतिम चर्चेआधीच वर्धा लोकसभेचा उमेदवार जाहीर

Wardha Politics News: वंचितने महाविकास आघाडीच्या जागा वाटपाआधीच वर्धा लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता. २ मार्च २०२४

Wardha Loksabha Election News:

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच आता वंचितने महाविकास आघाडीच्या जागा वाटपाआधीच वर्धा लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) वंचितला सामावून घेण्यासाठी बैठका करत आहे. मात्र महाविकास आघाडीत अद्यापपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यात आला नाही. महाविकास आघाडीचे नेते वंचितला सोबत घेण्यासाठी सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीच्या वर्धा जिल्हा कार्यकारिणीने आपला वर्धा लोकसभेचा उमेदवार जाहीर करत पुढील निर्णयासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठवला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वर्धा जिल्हा कार्यकारीने बैठक घेत प्राचार्य राजेंद्र साळुंखे यांच नाव लोकसभा उमेदवार म्हणून निश्चित केले आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेत माहिती देण्यात आली. मात्र वंचितकडून जाहीर करण्यात आलेली उमेदवारी ही महाविकास आघाडीवर जागावाटपासाठी दबावतंत्र तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीसोबत बोलणे सुरु आहे, पण अद्याप युतीबाबत निर्णय झाला नाही. यामुळे पूर्वतयारी म्हणून वर्धा जिल्हा कार्यकारिणीने उमेदवार ठरवला आहे. या उमेदवारबाबत वंचितच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून महाविकास आघाडीसोबत युती झाल्यास बाळासाहेब आंबेडकर अंतिम निर्णय घेतील, असे यावेळी सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! वयाच्या २३व्या वर्षी अभिनेत्रीने सोडले प्राण; 'या' गंभीर आजारामुळे मृत्यू, सिनेसृष्टीत हळहळ

Heart Blockage: हार्टमध्ये ब्लॉकेज आहेत का हे जाणून घ्या घरबसल्या, एकही पैसा खर्च न करता मिळवा अचूक माहिती

Maharashtra Live News Update: दिवाळीच्या सुट्टीनंतर जिल्हा परिषदेत शुकशुकाट

Sant Gajanan Maharaj Temple: दिवाळी आणि सुट्यांमुळे शेगावात भाविकांची प्रचंड गर्दी|VIDEO

Kalyan Crime News : दिवाळीच्या आनंदात मिठाचा खडा! फटाक्यांचा वाद टोकाला गेला, एकमेकांच्या डोक्यात फोडल्या कुंड्या

SCROLL FOR NEXT