Ajit Pawar and uddhav Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार

Ex MLA UBT Sharad Patil to join to NCP Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होणार आहे. या भूकंपाचे हादरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसणार आहेत. धुळ्यात माजी आमदार शरद पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

Nandkumar Joshi

भूषण अहिरे, धुळे | साम टीव्ही

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच महाराष्ट्रात पक्षबदलाचे वारे वाहू लागले आहेत. कोकणात ठाकरे गटाला शिंदे यांच्या शिवसेनेने हादरे दिल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धक्के देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटातील खदखद आता समोर आली असून, मोठं खिंडार पडणार आहे. माजी आमदार शरद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

धुळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पडणार आहे. माजी आमदार शरद पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधणार आहेत. शरद पाटील हे आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करणार आहेत. ते 'घड्याळ' हातात बांधणार आहेत. ते मुंबईत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

यापूर्वी शरद पाटील यांनी शिवसेनेमधून आमदारकी मिळवली होती. त्यानंतर मागील काही काळापासून पक्षातील कुरघोडींना कंटाळून काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केला होता. परंतु त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा शिवसेनेत ते परतले होते. परंतु, आता पुन्हा माजी आमदार शरद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज त्यांचा प्रवेश होणार आहे.

ठाकरे गटात नाराजी कायम

धुळ्यात ठाकरे गटात नाराजी कायम आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे पक्षाला मिळाली होती. या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते. मात्र, अनिल गोटेंना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं पक्षांतर्गत नाराजी होती. आता माजी आमदार शरद पाटील यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ही नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

SCROLL FOR NEXT