Uddhav Thackeray takes decisive action by reshuffling party leadership ahead of crucial elections. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं पक्षात सर्जिकल स्ट्राइक; ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान बड्या नेत्याला पदावरून हटवलं

Parbhani Politics : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी परभणीतील एका प्रमुख जिल्हा नेत्याला पदावरून हटवले आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय खळबळ उडाली आहे.

Bharat Jadhav

  • विधान परिषद निवडणुकीआधी मोठी राजकीय हालचाल

  • उद्धव ठाकरेंचा पक्षात ‘सर्जिकल स्ट्राइक’

  • परभणी जिल्हा प्रमुख पदावर बदल

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर आली असताना राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकांआधी ऑपरेश टायगरची चर्चा सुरू होती. ठाकरेंचे खासदार शिंदेच्या पक्षात जाणार असल्याचं चर्चांना पेव फुटले होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.

आताही ठाकरे गटात बंडाळी होण्याची चर्चा होती. अशातच उद्धव ठाकरेंनी पक्षात सर्जिकल स्ट्राइक केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे सेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहेत. संजय जाधव हे ठाकरे सेनेसोबत आहेत, असं खुद्द उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगतिले होते. त्याचदरम्यान आता परभणीमधील एक राजकीय बातमी आहे. ज्यामुळे खळबळ उडवून दिली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून परभणी जिल्हा प्रमुखाला तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले आहे. गंगाप्रसाद आनेराव यांच्याऐवजी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख पदी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करून खासदार संजय (बंडू जाधव ) यांना ठाकरेंनी मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

खासदार संजय जाधव आणि त्यांचे काही समर्थक परभणी लोकसभा मतदारसंघाच्या उद्धव ठाकरेंच्या यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला अनुपस्थित होते. यात गंगाप्रसाद आनेराव यांचाही समावेश होता. तसेच उपजिल्हाप्रमुख आणि काही तालुकाप्रमुखही अनुपस्थित होते. त्यामुळेच आता गंगाप्रसाद आनेराव यांची जिल्हा अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT