एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दिला मोठा धक्का
हिंगोलीतील ठाकरेसेनेला मोठं खिंडार पडलं
माजी आमदार संतोष टारफे शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार
हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी करत उद्धव ठाकरे यांना झटका दिला. माजी आमदार आणि ठाकरेसेनेच्या बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. शेकडो कार्यकर्ते आणि १२ पदाधिकाऱ्यांसह ते शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते हाती धनुष्यबाण घेणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे हिंगोलीत राजकीय समिकरणं बदलणार आहेत. तसंच हिंगोलीत शिंदेसेनेची ताकद वाढणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर संतोष टारफे यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि अनेक पदाधिकारी देखील शिंदेसेनेत उद्या प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहेत. हे सर्वजण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत.
एस पी राठोड, रमेश जाधव, सखाराम उबाळे, डिके दुर्गे पाटील यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेतील जिल्हाप्रमुख देखील शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. हिंगोलीमधून या पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील दाखल होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. चारचाकी वाहनांवर पक्षप्रवेशाचे स्टीकर लावून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. डॉक्टर संतोष टारफे यांच्या या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जिल्ह्यात पुन्हा एकदा ताकद वाढणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा शिंदेसेनेला होणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.