Uddhav-Raj Thackeray Yuti saamtv
महाराष्ट्र

Uddhav-Raj Thackeray Alliance: उद्धव-राज ठाकरेसाहेब एकत्र या! मुंबई पाठोपाठ डोंबिवलीत लागले बॅनर्स

Uddhav-Raj Thackeray Yuti: ठाकरे बंधुंनी एकत्र अशी साद आता डोंबिवलीकरांनी घातलीय. 'तुम्ही एकत्र याल तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी-दसरा' अशा आशयाचा बॅनर डोंबिवलीमध्ये लागवण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे का? यावर महाराष्ट्रातच नव्हेतर देशभरात चर्चा सुरूय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले तर राज्यातील राजकीय समीकरण बदललेल, अशी चर्चा रंगलीय. 'दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र या' असे बॅनर मुंबईतील शिवसेना भवन येथे लावले आहेत.

आता डोंबिवलीमध्येही ठाकरे बंधुंनी एकत्र यावी,अशी साद घालण्यात आलीय. तुम्ही एकत्र याल तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी दसरा' असा बॅनर डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेर लावण्यात आलाय. हा बॅनर शहरात चर्चेचा विषय ठरलाय.

काय आहे बॅनर...

'ठाकरे बंधू महाराष्ट्रातील जनता जनता तुम्ही एकत्र येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. तुम्ही एकत्र यायला तो दिवस महाराष्ट्रासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा मोठा दिवस असेल दोघांनी एकत्र आले पाहिजे ही काळाची गरज आहे मराठी माणसासाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठीआणि महाराष्ट्रात चाललेल्या गचाळ व निज गलिच्छ राजकारणासाठी नुसत्या बातमीने बघा सर्वसामान्य सामान्य माणसाला किती आनंद झालाय.

जेव्हा हे सत्यात उतरेल तेव्हा तर काय होईल हा विचार करा फक्त माझ्यासाठी लवकर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे' अशा आशयचा बॅनर निष्ठावंत शिवसैनिक रोहन अनंत पाटील, राहुल जयवंत चौधरी व शशांक शिवाजी इंदुलकरयांनी लावला आहे. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत सकारात्मकता दाखवलीय. त्याचदरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना वेग आल्यानंतर राज ठाकरेंनी मनसैनिकांना युतीबाबत बोलू नका, अशा सूचना दिल्यात. त्यामुळे राज ठाकरे परदेशातून महाराष्ट्रात परतल्यानंतर ते युतीच्या विषयावर सविस्तर बोलतील, असं म्हटलं जात आहे.

मुंबईनंतर पुण्यात झळकले बॅनर्स

मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुण्यात सुद्धा "ठाकरे बंधूनी एकत्र यावे" अशा मजकुराचे फ्लेक्स लावण्यात आले. पुणे शहरातील अनेक परिसरात हे फ्लेक्स उभारण्यात आले होते. यावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो एकत्र लावण्यात आलेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT