saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी त्यांचे भाऊ राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. दरम्यान मनसे आणि अगदी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपली भूमिका मांडली आहे.

Bharat Jadhav

  • काँग्रेसनं मविआत मनसेला घेण्यास नकार दिला आहे.

  • या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

  • ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मविआमध्ये मनसेला घेतलं जाणार का नाही त्यावरून चर्चा सुरू होत्या. मात्र आज काँग्रेसनं त्याबाबत भूमिका मांडली. काँग्रेस मनसेच नाहीतर शिवसेनेसोबतही जाण्यास इच्छुक नसल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सफकाळ म्हणाले. काँग्रेसच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे यांनी लागलीच राज ठाकरेंची त्यांच्या निवस्थानी त्यांची भेट घेतली.

दोन्ही भावांची ही ८ वी भेट आहे. राज ठाकरे यांच्या मात्रोश्रींचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले. गेल्या काही दिवसात दोन्ही भावांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आज दोन्ही भावांची ही ८ वी भेट आहे. मात्र आजच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण सकाळी काँग्रेसने मविआत मनसेला घ्यायचे का नाही याबाबत भूमिका मांडल्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले आहेत.

मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या दिपोत्सव कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे सहकुटुंबासोबत गेले होते. आता शिवतीर्थावर उद्धव ठकारेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीत दोन्ही भावांमध्ये काय चर्चा होणार आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. त्यांच्यात काही राजकीय चर्चा होणार का हे पहावे लागेल.

काँग्रेसची भूमिका

काँग्रेस राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबतही जाणार नाही, असा दावा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला होता. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टपणे कॉग्रेसची भूमिका मांडली आहे. सेना-मनसेसोबत जाऊ नये अशी नेते, कार्यकर्त्यांची भावना आहे. नेतृत्वासोबत बसून यावर चर्चा केली जाईल. ज्याक्षणी निवडणूक जाहीर होईल तेव्हा याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. ते बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT