NCP State President Post saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आणखी 2 नावांची चर्चा, दोघे ओबीसी समाजातील नेते

NCP State President Post: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. यात आता आणखी दोन नावांचा समावेश झाला आहे.

Rashmi Puranik

NCP State President Post News Upadtes: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षात भाकरी फिरवून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाऐवजी पक्षात एखादं पद द्या असं म्हटलं होतं.

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर (NCP State President Post) दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. दरम्यान राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी नेत्यांना संधी द्यावी असे वक्तव्य केले आहे. छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे आणि जिंतेंद्र आव्हाड यांच्यासह स्वत:चं नाव देखील सुचवलं आहे. त्यानतंर आता धनंजय मुंडे आणि जिंतेंद्र आव्हाड यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे दोघेही दोघे ओबीसी समाजातील नेते आहेत.

धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीत त्यांच्याशी बंड करून मागील दहा वर्षात धनंजय मुडे (Dhananjay Munde) यांनी स्वत:चं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केलंय. पाच वर्षे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलं.

मुंडे यांनी 16 मंत्रांचे भ्रष्टाचार उघडकीस आणले, त्यातील अनेक मंत्र्यांना कदाचित त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, तर काहीना पक्षाने तिकीटं नाकारली. विधान परिषदेतील सभागृहात सरकारवर आक्रमकपणे हल्ला करण्याबरोबरच मागील पाच वर्षाच्या पक्षाच्या कठीण काळात त्यांनी राज्यभर वेगवेगळ्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम केले.

धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. अजित पवार यांनीच त्यांना पक्षात आणले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार आणि अजित दादा यांच्यानंतर धनंजय मुंडे यांच्या सर्वाधिक सभांसाठी पदाधिकाऱ्यांची मागणी असते. त्यांनी स्वतः माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा परळीतून मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. यासोबतच त्यांनी बीड जिल्ह्यातून पक्षाच्या पारड्यात तब्बल ४ जागा स्वतःच्या बळावर निवडून आणल्या.

मराठवाड्यासह राज्यभरात सर्वत्र धनंजय मुंडेंच्या सभांना मोठी मागणी असते, त्यांच्यामागे मोठा जनाधार आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व असले तरी राज्यभरात सर्वत्र त्यांचा वावर असतो. परंतु मागील पाच वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी कामगिरी केल्यानंतरही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्यायसारखे दुय्यम दर्जाचे खाते देण्यात आले होते. (Marathi Tajya Batmya)

जितेंद्र आव्हाड यांची राजकीय कारकिर्द

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे राष्ट्रवादी काँग्रसेचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अनेक विषयांवर थेट आणि स्पष्ट मतं माडताना ते दिसले आहेत. आव्हाड शहरी चेहरा आणि स्पष्टवक्ते तरुण नेते आहेत. त्यांनी युवक काँग्रेसपासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. पद्मसिंह पाटील यांचे ते जिवलग होते. तेथूनच शरद पवार यांच्याशी त्यांची ओळख झाली. जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात. (Latest Political News)

पुरोगामी विचारसरणीसाठी कायम आंदोलन असो किंवा प्रबोधन ह्यात त्यांचा कायम पुढाकार असतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवार यांनी गृहनिर्माणसारखे महत्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती. दलीत आणि मुस्लिम समाजात देखील आव्हाड यांचा चांगला वावर आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते थेट आव्हान देतात. सोशल मीडियावर पुरोगामी विचारांच्या तरुणांत जिंतेंद्र आव्हाड लोकप्रिय आहेत. राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांमध्येही त्यांची चांगलीच लोकप्रियता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT