Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे गटाला झटका! शिवसेनेशी ३७ वर्षे एकनिष्ठ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Political News : ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका

  • माजी महापौर यांचा शिंदे गटात प्रवेश

  • एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील असे संकेत पाहायला मिळत आहेत. राज्यातील सर्व पक्षांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु केली आहे. मोठमोठ्या नेत्यांनी त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी काही दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. त्र्यंबक तुपे हे एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यांनी आज मुंबईत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्र्यंबक तुपे यांचा पक्षप्रवेश झाला.

त्र्यंबक तुपे हे मागील ३७ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ होते. ते पक्षाचे सहसंपर्कप्रमुख होते. तुपे यांनी महापौरपददेखील भूषवले आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात होते. आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

ठाकरे गटातून बाहेर पडताना त्र्यंबक तुपे त्यांचा राजीनामा विनायक राऊत यांच्याकडे सुपूर्त केला होता. त्यावेळेस तुपे यांनी त्यांची बाजू मांडली होती. 'ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी कुठलीच नाराजी नाही. मात्र मला माझ्या वॉर्डाच्या विकासाचा विचार करणे आवश्यक आहे', अशी प्रतिक्रिया तुपे यांनी दिली होती. याच कारणामुळे त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT