Sanjay Raut vs Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: आत्ताच मुख्यमंत्री होणार! अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Sanjay Raut On Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाबद्दल अजित पवार यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Gangappa Pujari

Sanjay Raut News: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळ समुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी रोखठोक वक्तव्य केले होते. ज्यामध्ये त्यांनी आत्ताही मुख्यमंत्रीपदावर दावा करु शकतो असे सूचक वक्तव्य केले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार यांच्या याच वक्तव्यावर शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) सध्या जळगावमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्यामध्ये उद्या होणाऱ्या सभेबद्दल माहिती सांगितली. तसेच यावेळी संजय राऊत यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल केलेल्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत...

याबद्दल बोलताना संजय राऊत यांनी "मुख्यमंत्री होणं कोणाला आवडणार नाही. अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. अजितदादा हे अनेक वर्ष मंत्री आहेत. एखाद्याच्या भाग्यात असेल तर ते मुख्यमंत्री होतील," असंही राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा..

तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (EKnath Shinde) यावेळी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीत अनेक मोठे खुलासे केले होते. ज्यामध्ये त्यांनी 2024 ला नाही तर मी आताच मुख्यमंत्री होणार असं सूचक वक्तव्य केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT