Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

Maharashtra Politics : शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

Shivaji Kale

Maharashtra Politics : शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर उद्या दुपारी ३:३० वाजता सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर करावी अशी विनंती ठाकरे गटाने केली होती. मात्र, ही सुनावणी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील ३ न्यायाधीशांच्या खंडापीठासमोर होणार आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून हा निर्णय पक्षपातीपणाचा असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच निवडणूक आयोगाने दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला. या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च्य न्यायालायत धाव घेतली आहे. या याचिकेवर आता बुधवारी दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय सदोष असल्याचे सांगत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाला या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात याचिका दाखल केलेली आहे. परंतु ठाकरे गटाने ही याचिका दाखल करण्याधीच निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. आमची बाजून ऐकूण घेतल्याशिवाय कोणताही निर्णय देऊन नये असे शिंदे गटाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT