Sandeep Jagtap Resign: राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी' संघटनेला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा राजीनामा
Maharashtra Politics Breaking News: Saamtv
महाराष्ट्र

Sandeep Jagtap Resign: राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी' संघटनेला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा राजीनामा

Gangappa Pujari

सागर आव्हाड| पुणे, ता. २५ जून २०२४

लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पराभवाची सल कायम असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यभर फिरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, "राज्यभर फिरण्याची आर्थिक परिस्थिती नाही,' असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभेतील पराभवानंतर आता विधानसभेच्या तोंडावर जगताप यांनी साथ सोडल्याने स्वाभिमानी संघटनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

काय म्हणाले संदीप जगताप?

"खूप जड अंतकरणाने राज्य कार्यकारणीसमोर मी राजीनामा ठेवला. राज्यभर व जिल्ह्यात देखील फिरण्यासाठी प्रचंड पैसे लागतात. वडिलांचे वय 72 झाले आहे. आई आजारी आहे. मुलाचे शिक्षण सुरू आहे. शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. कित्येक वर्षापासून नवीन पुस्तक आलं नाही. लेखन बंद झाले आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हा निर्णय घेतला," असे संदीप जगताप यांनी स्पष्ट केले.

"कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर राजू शेट्टी साहेबांसोबत काम करत राहणार आहे. पुढील काही दिवसात राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणी माझ्या राजीनाम्याचा स्विकार करतील व नव्या चेहऱ्याला संधी देतील अशी मला अपेक्षा आहे. माझ्या कार्यकाळात माझ्याकडून कुठलीही अपेक्षा न करता नाशिक जिल्ह्यातील व राज्यातील सर्व पत्रकार बांधवांनी माझ्यावरती लहान भावासारखे प्रेम केले, असेही ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

International Plastic Bag Free Day : प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये खाणं आहे धोक्याचं, आरोग्यावर होतात दुष्परिणाम

Pune: काँग्रेस भवनाला छावणीचं स्वरुप; अरविंद शिंदेंच्या 'त्या' वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन!

India-Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफीत रंगणार थरार; भारत-पाकिस्तान येणार आमनेसामने; कधी होणार सामने?

Vastu Tips: घरामधील 'या' दिशेला मनी प्लांट लावल्यास होईल धनलाभ

Ashadhi Wari 2024: संत सोपानकाकांची पालखी विठुरायाच्या दिशेने मार्गस्थ!

SCROLL FOR NEXT