Ajit Pawar Sunetra Pawar Saamtv
महाराष्ट्र

Sunetra Pawar News: तुमच्यासाठीही अजित पवार नॉटरिचेबल असतात का? सुनेत्रा पवार म्हणाल्या...

Sunetra Pawar On Ajit Pawar: सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या राजकारणा पलिकडल्या अनेक छटा सांगितल्या...

Gangappa Pujari

Sunetra Pawar News: राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे नेते अजित पवार सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहेत. मागच्या आठवड्यात अजित पवार नॉटरिचेबल असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. अजित पवार नॉटरिचेबल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अजित पवार नॉटरिचेबल असल्याच्या बातम्या समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

याच पार्श्वभूमीवर "अजित पवार तुमच्यासाठी कधी नॉटरिचेबल असतात का,? असा सवाल त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला. ज्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळ माध्यम समुहातर्फे सुनेत्रा पवार यांची Exclusive मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी राजकारणा पलिकडल्या दादांच्या अनेक छटा सांगितल्या. यावेळी त्यांना "अजित पवार तुमच्यासाठी नॉट रिचेबल असताता का?," असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.

याबद्दल बोलताना "अजित पवार (Ajit Pawar) कामात खूप व्यस्त असतात. बहुतेक वेळा ते बाहेर असतात. त्यामुळे खूप कमी वेळ ते घरी असतात. ते माझ्यासाठी कधीच नॉट रिचेबल नसतात. त्यांना जेव्हा काम असते तेव्हा ते कॉल करतात किंवा मला काम असले तर मी त्यांना कॉल करते. पण ते कधी नॉट रिचेबल नसतात, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या..

घरातही चालते दादांची दादागिरी...?

दरम्यान, यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांना राजकारणात जरी दादांचा शब्द चालत असला तरी घरात कोणाचा शब्द अंतिम असतो, असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल बोलताना त्यांनी घरातही दादांचाच शब्द अंतिम असतो, असे उत्तर दिले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Dhule: गावच्या रस्त्यावर रिपोर्टिंग करणाऱ्या त्या शाळकरी मुलींना आदित्य ठाकरेंकडून सायकल भेट

Gen Alpha Club: 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते', त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याची दुरवस्था, बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा

Shravan Fasting : श्रावणात उपवासाला खा ८ चविष्ट पदार्थ, दिवसभर एनर्जी टिकून राहील!

Sangli : भाजप नेत्यांवर टक्केवारीचा आरोप, नगरसेवकांमध्ये धक्काबुकी; विरोधी पक्षनेते म्हणाले, भाजपपुढे झुकणार नाही! VIDEO

सांगलीत एसटी बसचा समोरासमोर अपघात, 2 ते 3 प्रवाशांचा जागेवर मृत्यू; 15 ते 20 जखमी

SCROLL FOR NEXT