वर्षभरापूर्वी कुठल्याही राजकीय पदावरच काय तर पटलावरही नसलेल्या सुनेत्रा पवार सध्या संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेतल्या सर्वोच्च खुर्चीवर विराजमान झाल्याचं दिसत आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सुनेत्रा पवारांची तालिका सभापतीपदी निवड केलीय. तालिका सभापतींची निवड का केली जाते? पाहूयात.
संसदेच्या कामकाजावेळी सभापती सलग सर्व कामकाज पाहू शकत नसल्यानं तालिका सभापतींची निवड
सभापती आणि उपसभापतींच्या अनुपस्थितीत कामकाज पाहण्यासाठी सर्वपक्षीय पॅनलची निवड
खासदारांच्या संख्येनुसार तालिका अध्यक्षांची नियुक्ती केली जाते
तालिका सभापतीपदावर बसल्यानंतर सुनेत्रा पवारांनी स्वपक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेलांनाच नियमाची आठवण करुन दिलीय. एवढंच नाही तर तालिका सभापतीपदी नेमणूक झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी इंग्रजीतून कामकाजात केलंय. आधी लोकसभेत पराभव त्यानंतर राज्यसभा खासदारपदी वर्णी, त्यापाठोपाठ मिळालेला मानाचा बंगला आणि आता त्यांची थेट राज्यसभेच्या तालिका सभापतीपदी निवड यामुळे सुनेत्रा पवार पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यामुळे सुनेत्रा पवारांची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पॉवर वाढणार का? आणि आगामी काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्रिपदावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंऐवजी सुनेत्रा पवारांचीच तर वर्णी लागणार नाही ना ? याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.