Thorat Vs Vikhe Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: संस्कृती बदलण्याची वेळ आली, सुजय विखेंनी पुन्हा थोरातांना डिवचले

Sujay Vikhe Patil Criticized Balasaheb Thorat: सुजय विखे यांनी थोरात आणि विखे यांच्या संस्कृतीतला फरक सांगितला. बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातच सुजय विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Priya More

सचिन बनसोडे, शिर्डी

माजी खासदार सुजय विखे यांनी पुन्हा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे - जयश्री थोरात यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संगमनेर तालुक्यामध्ये झालेल्या सभेमध्ये सुजय विखेंनी जबरदस्त भाषण करत थोरातांवर टीका केली. यावेळी सुजय विखे यांनी थोरात आणि विखे यांच्या संस्कृतीतला फरक सांगितला. 'संगमनेरवालो डरो मत... इस बार संगमनेर मे भी कमल खिलेगा.' बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातच सुजय विखेंनी हे मोठं वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी 'कशाला कोणाला घाबरता? संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी निर्णय घ्या.', असे आवाहन सुजय विखेंनी जनतेला केले आहे.

सुजय विखेंनी संगमनेर येथे भाषण करताना बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी सांगितले की, 'एक काळ होता तेव्हा एखादा नेता १० सभा असल्या तरी तेच तेच भाषण करायचा. त्यावेळी मोबाईल आणि सोशल मीडिया नव्हता. मी ज्या ज्या वेळी संगमनेरला येतो लोकं मेसेज टाकतात नवीन काहीतरी होऊ द्या. रोज नवीन भाषण कुठून शोधायचं? मला रोज नवीन भाषण करायला सांगता. मग संगमनेरकरांनी ४० वर्षे एकच टेप कसा ऐकला?' यांचे मुद्दे ठरलेले. हा संगमनेर तालुका आमचा परिवार आहे. बाहेरची लोकं येऊन कुटुंबात भांडण लावतायेत. यांना हद्दपार करा. हेच ४० वर्षे ऐकत आलो आहे. आधी वडील बोलायचे, आता राजकन्या बोलते.'

सुजय विखेंनी पुढे सांगितले की, 'यांनी जेवढी गावं दत्तक घेतले त्यांना एक रुपयासुद्धा निधी मिळाला नाही. त्या प्रत्येक गावात सरपंच विखे पाटलांचा आला. ज्यांनी दत्तक घेतलं त्यांच्या बस आधीच कुटुंबाच्या माणसांनी भरलेल्या. आता कुठेही जाऊ नका तुम्हाला दत्तक घेण्यासाठी सुजय विखे इथे आलेला आहे. आमची गाडी मोकळी आहे. आमच्या गाडीत ठेकेदार आणि वाळूवाले सापडणार नाहीत. आमच्या गाडीत सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य सरपंच सर्वसामान्य कार्यकर्ताच दिसेल. माझं गाडीत रोज लक्ष असतं. काल बसलेला पुन्हा बसला तर त्याला मी विनंती करून खाली उतरवतो. ४० वर्षे यांनी जनतेला दाबले. मला कोणत्याही सभेला गर्दी करण्याची वेळ आली नाही. आता दहशत नाही. दडपशाही मोडून काढू. संगमनेरमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी परमेश्वराने सुजय विखेला पाठवलंय.'

सुजय विखेंनी जयश्री थोरातांवर टीका करताना सांगितले की, 'आमच्या ताईचे आभार. त्या रोज मला एक नवीन मुद्दा देतात. आता आमच्या संस्कृतीवरून टीका करतात. या ठिकाणच्या माजी महसूलमंत्र्यांची संस्कृती काय? इथे फक्त वाळू वाहा आणि तहसीलदारांनी पहा. मात्र आपण आलो आणि एक-एक वाळू तस्कराचा बंदोबस्त केला. आता संस्कृती बदलण्याची वेळ आली आहे. या विधानसभेत संगमनेर तालुक्याचे जनता निर्णय घेणार आहे.' तसंच, युवा जनसंवाद मेळाव्यात युवा कुठे आहे? ज्या युवकासाठी यात्रा काढली त्यात युवक नाही. त्यात फक्त ठेकेदार, सरपंचाची मुलं आहेत. या लोकांचा बंदोबस्त करायचा असेल तर यांना जमिनीपासून उकडून फेका. जंगली झाडांचा बंदोबस्त करायचा असेल तर आना पोकलेन आणि उखडून टाका.', असा इशारा सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP: अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; विधानसभेत चालू राहणार घड्याळाची टिक-टिक

Bribe case : बिल अदा करण्यासाठी २ लाखाची मागणी; बीडीओसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Sameer Bhujbal : छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांची वेगळी चूल; महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार

Amit Shaha News : शहांच्या राज्यातील भाजप नेत्यांना सक्त सूचना | Video

Ear Piercing: लहानपणी मुलांचे कान का टोचतात?

SCROLL FOR NEXT