Yavatmal News : पावसामुळे सोयाबीन भिजला; ओलाव्यामुळे नाफेडने सोयाबीनची खरेदी थांबविली, शेतकरी अडचणीत

Yavatmal News : खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या सोयाबीन काढणीला आला असताना परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले.
Soyabean
SoyabeanSaam tv
Published On

संजय राठोड
यवतमाळ
: परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने काढणीला आलेला सोयाबीन पावसाच्या पाण्यात भिजला आहे. यामुळे त्याची काढणी केल्यानंतर सोयाबीनमध्ये ओलावा आहे. यामुळे नाफेडकडून सोयाबीनची खरेदी थांबविण्यात आली आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या सोयाबीन (Soyabean) काढणीला आला असताना परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे काढणीवर असलेला सोयाबीन पूर्णपणे पावसात भिजला. दरम्यान १५ ओक्टोम्बरपासून शासकीय खरेदी केंद्र असलेल्या नाफेडने खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र शेतकरी आणत असलेला सोयाबीनचा माल ओला असल्याने नाफेडकडून असा माल खरेदी केला जात नाही. शासकीय हमी केंद्रात सोयाबीनची खरेदी थांबविण्यात आल्याने दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन उत्पादक (farmer) शेतकरी अडचणीत सापडला आहेत. 

Soyabean
Malkapur Vidhan Sabha : मलकापूर विधानसभेत सेवानिवृत्त अधिकारी रिंगणात; भाजप व काँग्रेससमोर आव्हान

दरही खाली घसरले 

यवतमाळच्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर तीन हजार चारशे रूपये पर्यंत खाली घसरले असून शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीसाठी हमी केंद्राकडे मोर्चा वळविला. मात्र तीन दिवसापूर्वी पाऊस बरसल्याने सोयाबीनमध्ये प्रचंड ओलावा निर्माण झाला. त्यामुळे हि खरेदी देखील थांबली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com