Maharashtra Politics
Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पवारांच्या 'त्या' वक्तव्यानंतर मंत्रालयात सरकार बदलाच्या जोरादार चर्चा! अधिकारी, कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली

Chandrakant Jagtap

>>सुशांत सावंत

Maharashtra Political News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. राज्यात सत्ता बदलाच्या चर्चा रंगलेल्या असताना सत्ताधारांपासून ते विरोधकांपर्यंत या चर्चा निव्वळ अफवा असल्याचा दावा केला जात आहे. परंतु रोग कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे किंवा घडामोडीमुळे या चर्चांना पुन्हा पुन्हा बळ मिळत आहे. आता मंत्रालयात देखील सत्ताबदलाच्या चर्चा उघड उघड सुरू झाल्या आहेत.

राज्याच्या गाडा ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या मंत्रालयात देखील आता राज्यात सत्ताबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सरकार बदलणार असल्याच्या उघड उघड चर्चा होत आहेत. यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. तसेच अंतिम टप्प्यात काम असलेल्या कंत्राटदारांमध्ये देखील धास्ती निर्माण झाली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यात सत्ताबदल होईल असा दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजप नाराज असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा देखील झाली. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मंत्रालयात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

शरद पवार यांनी काल आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राज्यात सत्ताबदल होईल अशी चर्चा मंत्रालयात रंगली आहे. याबाबत मंत्राल्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उघड उघड चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांमुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची डोकेदुखी देखील वाढली आहे. मंत्रालयात येणारे आमदार आणि इतर लोक आपले कामे पटापट संपवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे अग्रह धरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरील दबाव वाढला आहे. (Latest Political News)

Edited By - Chandrakant Jagtap

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

ICICI Bank : NRI ग्राहकांसाठी ICICI बँकेचा महत्वपूर्ण निर्णय; परदेशातील मोबाईल नंबरवरून भारतात करता येणार UPI पेमेंट

सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

SCROLL FOR NEXT