Shrirampur Vidhan Sabha Saam Tv
महाराष्ट्र

Shrirampur Vidhan Sabha : विधानसभेसाठी श्रीरामपूरमधून इच्छुकांची भली मोठी यादी, कोणाला मिळणार संधी? वाचा सध्याची राजकीय परिस्थिती

Rohini Gudaghe

मुंबई : यंदा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार लोखंडे यांचे पुत्र आणि यासोबतच मोठी यादी समोर आलीय. येथील विद्यमान आमदार डॉ. लहू कानडे हे काँग्रेस पक्षाचे आहेत. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडणूक आला, परंतु श्रीरामपूरमधून मतांचं लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळाल्याचं दिसतंय. आपण श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय परिस्थिती सविस्तर जाणून घेवू या.

लोकसभा निवडणुकीत मविआला यश...

शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा 'शिवसेना विरुद्ध शिवसेना' अशी लढत झाली (Vidhan Sabha Election 2024) होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघावर मागील दहा वर्षांपासून शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांची सत्ता होती. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाजी मारली.त्यांनी लोखंडे यांचा पराभव करत शिर्डीत विजयाचा गुलाल उधळलाय. त्यामुळे महायुतीला नगर जिल्ह्यात जबरदस्त धक्का बसलाय. याअनुषंगाने नगरमध्ये आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने चांगलीच कंबर कसलेली आहे. त्यामुळे यंदा महायुतीकडून श्रीरामपूरमधून विधानसभेच्या रिंगणात कोण उतरणार? याकडे अख्ख्या नगरकरांचं लक्ष लागेललं आहे.

सध्या काय परिस्थिती ?

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये नेहमी ससाणे याची भूमिका महत्वाची (Shrirampur Vidhan Sabha Matdarsangh Profile) ठरलीय. सध्या श्रीरामपूर तालुक्यात कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विद्यमान आमदार लहू कानडे हे पहिले दावेदार असल्याचं समोर येतंय. तर कॉंग्रेसमधील देशपातळीवर काम पाहणारे हेमंत ओगले देखील विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक असल्याची माहिती मिळत आहे. तर हेमंत ओगले यांना ससाणे यांचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू आहे. मागील दोन वर्षापासून त्यांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे.

महायुतीकडून शिंदे सेना आणि भाजप दोन्ही देखील विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छूक आहे. शिंदे गटातील नेते युती माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपकडून नितीन दिनकर देखील मतदारसंघावर दावा करत (Congress Vs BJP) आहेत. कांबळे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात शिंदे गटात प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिलाय, असा दावा भाऊसाहेब कांबळे करत आहेत. त्यामुळे महायुतीकडून नेमकं कोण श्रीरामपूर विधानसभेच्या रिंगणात उतरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे श्रीरामपूरमध्ये विजयाचा गुलाल कोणाच्या माथी लागणार, याकडे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.

२०१९ ची विधानसभा निवडणूक

श्रीरामपूरमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे लहू कानडे ९३,९०६ मतांनी विजयी झाले (Mahavikas Aaghadi Against Mahayuti) होते. तर शिवसेना पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे १८,९९४ मतांनी पराभूत झाले होते. बंडखोरीच्या राजकारणानंतर भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. सध्या श्रीरामपूरमध्ये कॉंग्रसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांची सत्ता आहे.

२०१४ ची विधानसभा निवडणूक

श्रीरामपूरमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस विरूद्ध भाजप असा सामना झाला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे ५७,११८ मतांनी विजयी झाले (Maharashtra Politics) होते, तर भाजपचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना ११, ४४८ मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. विखे समर्थक म्हणून कांबळे यांची ओळख होती. आमदार भाऊसाहेब कांबळे यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. आता नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यंदा श्रीरामपूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत होणार, हे नक्की आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari : नवीन तंत्रज्ञानाने १० वर्षांत रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही...; गडकरींची भर कार्यक्रमात गॅरंटी

Uday Samant News: पायलटचा टेक ऑफला नकार, उदय सामंतांना करावा लागला कारने प्रवास, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

Chandrapur News: चंद्रपुरमधील शाळा अदानींच्या ताब्यात! राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ दिवसात व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश

Viral News: अबब...! तरुणीच्या डोक्यावर चक्क वेटोळे मारुन बसला साप; VIDEO व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

SCROLL FOR NEXT